27 C
Mumbai
Friday, June 24, 2022
घरक्राईमनामाजम्मू काश्मीरमध्ये दोन हल्ल्यांत मजुरासह बँक मॅनेजरचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये दोन हल्ल्यांत मजुरासह बँक मॅनेजरचा मृत्यू

Related

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवार, २ जून रोजी मजुरांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. बडगाममध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला झाला असून यात एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बडगाम मगरेपोरा चडूरा भागात दहशतवाद्यांनी वीट भट्टीत काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दिलखुश या मजुराचा मृत्यू झाला. हा मजूर बिहार येथील रहिवासी होता. तर, एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याचे नाव राजन आहे. हा मजूर पंजाबचा रहिवासी आहे.

हे ही वाचा:

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

RBI ची ‘सोन’ पावलं !

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार

ईडीच्या चौकशीआधी सोनिया गांधी यांना कोरोना

दुसऱ्या एका घटनेत कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बँक मॅनेजर जखमी झाले होते. रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजयकुमार असे या बँक मॅनेजरचे नाव असून ते राजस्थानचे रहिवासी होते. याआधी मंगळवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा