26 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरक्राईमनामाकुर्ल्यात कशा जळल्या २० ते ३० दुचाकी?

कुर्ल्यात कशा जळल्या २० ते ३० दुचाकी?

Google News Follow

Related

मुंबईतील कुर्ला परिसरात आज (१३ ऑक्टोबर) पहाटे अचानक २० ते ३० दुचाकींनी पेट घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक जवळच्या परिसरात एका इमारती खाली उभ्या असणाऱ्या दुचाकींनी पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहचत होत्या.

पहाटे अचानक २० ते ३० दुचाकींनी पेट घेतल्यावर संबंधित प्रकरणाची माहिती अग्निशमन दलाला मिळताच दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून यामध्ये सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे भीती निर्माण झाली आहे. ही आग कुणी मुद्दाम लावली किंवा चुकून लागली याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

हे ही वाचा:

मुंबई सायबर विभागाचा ई मेल हॅक; ‘या’ तीन ठिकाणी हॅकर्सचे केंद्र

खडसेंच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार

अनुपम खेर म्हणतात, काश्मीरातील हिंदुंच्या हत्येने ३१ वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली!

अतिरेकी संघटना त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांनाच नंतर पछाडतात!

सन २०१८, २०१९मध्ये सायन आणि दादर येथे अनुक्रमे अशाच दुचाकी जळाल्याच्या घटना घडल्या होत्या. या दुचाकींच्या प्रकरणातील आरोपी अजूनही कोण आहेत हे स्पष्ट झालेले नाही. सायनमधील श्री सुंदर कमलानगरमध्ये रात्री १७ ते १८ दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. दादर च्या शिवाजी पार्क परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच दुचाकी जाळून खाक झाल्या होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा