30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषमनोरंजनाचा पडदा पुन्हा उघडणार

मनोरंजनाचा पडदा पुन्हा उघडणार

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मोकळ्या जागतील कार्यक्रमांनाही परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

२२ ऑक्टोबर पासून मुंबईसह राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यात येणार आहेत. ५० टक्के आसन क्षमतेने ही चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू केली जाणार आहेत. तर मोकळ्या जागेवर होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भाची नियमावली सरकारने जारी केली आहे.

राज्यभर सुरू होणारी सिनेमागृहे, नाट्यगृहे ही ५०% क्षमतेने कार्यान्वित असतील. तर ती सुरू होण्यापूर्वी संपूर्ण जागेचे सॅनिटायझेशन करणे आवश्यक असणार आहे. तसेच इथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असणार आहे.

हे ही वाचा:

पुणे हादरले! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या

अतिरेकी संघटना त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांनाच नंतर पछाडतात!

खडसेंच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार

अमित शहांनी केली काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात!

सभागृहातील एसीची मर्यादा २४ ते ३० अंश सेल्सिअस इतकी ठेवण्याचे निर्बंध सरकारने घातले आहेत. तर नाटकात काम करणाऱ्या किंवा खासगी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांपैकी बालकलाकार सोडता इतर सर्वांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. तर प्रेक्षकांचीही संपूर्ण लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रमानंतर सभागृहाचे, नाट्यगृहाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे.

सरकारने नाट्यगृह, सिनेमागृह आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांमध्ये आणि कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेले अनेक महिने महाराष्ट्र लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकल्याचा मनोरंजन क्षेत्रावर परिणाम झाला. पण आता हे क्षेत्रदेखील पूर्वपदावर येण्याच्या तयारीत आहे. मनोरंजन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या अनेकांची उपजीविका पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसू लागली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा