33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामामुंबई सायबर विभागाचा ई मेल हॅक; 'या' तीन ठिकाणी हॅकर्सचे केंद्र

मुंबई सायबर विभागाचा ई मेल हॅक; ‘या’ तीन ठिकाणी हॅकर्सचे केंद्र

Google News Follow

Related

मुंबई पूर्व सायबर विभागाचा ई मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आला आहे. हॅकर कडून ‘जेके हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार’ या आशयाचा ई मेल मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागातून राज्यभरातील पोलीस ठाण्याच्या अधिकृत ई मेल आयडीवर पाठवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राज्य सायबर विभागाकडून हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून या मेलसोबत येणारी फाईल उघडू नये, असे आवाहन राज्य सायबर सेलकडून राज्यभरातील पोलिसांना करण्यात आले आहे. या हॅकरचे केंद्र हे पाकिस्तान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश आहे अशी माहितीही मिळाली आहे.

मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्हे विभाग व्यतिरिक्त प्रत्येक प्रादेशिक विभागात सायबर विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबई पूर्व, पश्चिम, दक्षिण , उत्तर आणि मध्य असे पाच सायबर विभाग सुरू करण्यात आलेले आहे. प्रत्येक सायबर विभागात त्या त्या प्रादेशिक विभागातील पोलीस ठाण्यातील सायबरचे गुन्हे दाखक होऊन तपास केला जात आहे. यापैकी पूर्व सायबर विभागाचा ई मेल आयडी अज्ञात हॅकर कडून हॅक करण्यात आला आहे.

या हॅकर कडून पूर्व सायबर विभागाच्या अधिकृत मेल आयडी वरून राज्यातील सर्व पोलीस ठाणे, शासकीय विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांना फिशिंग मेल पाठवण्यात येत आहे. या ई मेल मध्ये इंग्रजी मध्ये ‘terrorist behind jk attack gunned down in mumbai’ (‘जेके हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार) या आशयाचा मेल आणि सोबत ‘रिपोर्ट इंटेलिजन्स’ नावाने पीडीएफ’ फाईल पाठवली जात आहे. ही फाईल उघडल्यानंतर संगणकातील डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण ‘महाराष्ट्र सायबर विभागाने गंभीरतेने घेतले असून राज्यभरातील पोलीस ठाणे शासकीय विभागाला सतर्क करण्यात आलेले असून या आशयाचा ईमेल उघडू नये तसेच त्यासोबत असलेली पीडीएफ डाउनलोड करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी पत्रक पाठवून केले आहे.

हे ही वाचा:

खडसेंच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार

अनुपम खेर म्हणतात, काश्मीरातील हिंदुंच्या हत्येने ३१ वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली!

अतिरेकी संघटना त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांनाच नंतर पछाडतात!

फडणवीस म्हणतात, ‘मी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने कधी जाणवूच दिले नाही’

 

या प्रकारे ई मेल हॅक करून पोलीस दलाचा महत्वाचा डेटा चोरी करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले असावे, तसेच हा गंभीर प्रकार असून या प्रकारे फिशिंग मेल पाठवून हॅकरकडून सायबर हल्ला घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा