31 C
Mumbai
Wednesday, May 27, 2026
घरक्राईमनामाबिष्णोई गँगशी कनेक्शन? मुंबईत चिनी बनावटीच्या पिस्तुलासह तिघांना अटक

बिष्णोई गँगशी कनेक्शन? मुंबईत चिनी बनावटीच्या पिस्तुलासह तिघांना अटक

बॉलिवूड सेलिब्रिटी टार्गेटवर असल्याचा संशय

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने (AEC) एका मोठ्या कारवाईत तीन संशयित आरोपींना मुंबईतून अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी मुंबईत पिस्तूल पोहोचवण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे हत्यार मुंबईत नक्की कोणाला दिले जाणार होते आणि त्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता, याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले पिस्तूल ‘मेड इन चायना’ (चिनी बनावटीचे) असण्याची शक्यता आहे. हे हत्यार नेपाळच्या सीमेवरून भारतात छुप्या मार्गाने आणले गेल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक करण्यात आलेले आरोपी पंजाब आणि राजस्थानचे रहिवासी आहेत. या राज्यांमध्ये कुख्यात ‘बिष्णोई गँग’चा मोठा प्रभाव असल्याने, या कारवाईत बिष्णोई गँगचे कनेक्शन असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

हे ही वाचा:

PSLV तंत्रज्ञान भारतीय खासगी कंपन्यांना हस्तांतरित होणार; काय आहे फायदा?

अंदमान समुद्रात मान्सूनची दमदार एन्ट्री

भाजपमध्ये प्रवेशानंतर राघव चड्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी

बंगालमध्ये ईदची सुट्टी फक्त एका दिवसाची!

जशन प्रीत मंगल सिंग (वय २४)– रा. पटियाला, पंजाब, सुखविंदर चंद्रपाल (वय २४)– रा. पटियाला, पंजाब, अरबाज अन्वर चौधरी (वय ३४) – रा. झालावाड, राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील दोन्ही आरोपींवर खून (मर्डर) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह प्रत्येकी ४ गुन्हे दाखल आहेत. तर राजस्थानच्या अरबाज चौधरीवर तब्बल १९ गुन्हे नोंद आहेत. प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, यातील काही आरोपींचा पंजाबमधील सनौर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ‘गुन्हा क्रमांक ९५/२२’ शी संबंध आहे.
हे आरोपी पंजाबवरून हत्यार घेऊन मुंबईत आले होते.

प्रवासादरम्यान त्यांनी ट्रेन आणि रस्ते वाहतुकीचा वापर केला. मुंबईत आल्यानंतर हे तिघेही एका लॉजमध्ये एकत्र थांबले होते. पंजाब आणि राजस्थानचे हे आरोपी मुंबईतच एकमेकांना भेटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या पोलिस या बेकायदेशीर शस्त्र पुरवठ्यामागील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत.

तपास यंत्रणांसमोर सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, या आरोपींच्या निशाण्यावर मुंबईत नक्की कोण होते? बिष्णोई गँगने यापूर्वी बॉलिवूडमधील नामांकित व्यक्तींना धमक्या दिल्या आहेत, तसेच चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींवर हल्ल्यांचे प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. याच पार्श्वभूमीवर, हे आरोपी मुंबईतील एखाद्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीला टार्गेट करण्यासाठी आले होते का? या अँगलनेही पोलिस कसून चौकशी करत आहेत.

सध्या पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यांच्या कॉल डिटेल्स (CDR), चॅट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण सुरू आहे. या तपासातून लवकरच आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
309,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा