29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाभाजप नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

भाजप नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

Google News Follow

Related

सांगली जिल्ह्यातून दुःखद बातमी आहे. भाजपचे नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जत येथे हा प्रकार घडला असून सांगली जिल्ह्यात यामुळं खळबळ माजली आहे. अज्ञात व्यक्तींनी विजय ताड यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ताड यांचा मृत्यू झाला आहे. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील करत आहेत.

जत तालुक्यातील सांगोला रस्त्यावर ही हत्या करण्यात आली आहे. विजय ताड हे आपल्या इनोव्हा कारमधून जात होते. ताड हे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात होते. शाळेजवळ येताच अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवत केलेल्या बेछूट गोळीबार केला. गोळीबारानंतर जखमी झालेले विजय ताड गाडीतून उतरल्यानंतर त्यांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

हे ही वाचा:

‘भल्लालदेव’ डागुबट्टीच्या उजव्या डोळ्यावर झाली शस्त्रक्रिया, किडनीही बसवली

लालबागमध्ये आईची निर्घृण हत्या करणारी तरुणी होती सँडविच विकणाऱ्याच्या संपर्कात

धीरेंद्र कृष्ण शास्त्री मिरारोडमध्ये; काँग्रेस, अंनिस म्हणतात कार्यक्रम होऊ देणार नाही

मुंबई सेंट्रल स्थानकाचा स्लॅब कोसळला, जीवीतहानी टळली

दिवसाढवळ्या झालेल्या राजकीय नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. या गोळीबाराच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी असा प्राथमिस अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतु हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोळीबाराची बातमी कळताच विजय ताड यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. जतमध्ये भरदिवसा गोळीबाराच्या घटनेने सर्वानाच धक्का बसला आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा