29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरक्राईमनामादिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी; मेलमध्ये द्रमुकचा उल्लेख

दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी; मेलमध्ये द्रमुकचा उल्लेख

पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली. माहितीनुसार, एक धमकीचा ईमेल आला असून ज्यामध्ये न्यायालयाच्या आवारात तीन बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दुपारी २ वाजेपर्यंत उच्च न्यायालय रिकामे करण्याचाही इशारा दिला आहे. हा धमकीचा मेल मिळताच खबरदारी म्हणून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे.

माहितीनुसार, न्यायालयाच्या आवारात तीन बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करत दुपारी २ वाजेपर्यंत जागा रिकामी करण्याची धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती. या संदेशात स्फोटकांचे नेमके ठिकाण स्पष्ट केलेले नाही. बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक तात्काळ तैनात करण्यात आले आणि संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.

कनिमोझी थेविडिया नावाच्या ईमेलवरून पाठवलेल्या या ईमेलमध्ये काही राजकीय संदर्भ देण्यात आले होते. मेलमध्ये काही राजकारण्यांना लक्ष्य करणाऱ्या कठोर टिप्पणींचा समावेश होता; काही विशिष्ट नावे देखील नमूद करण्यात आली होती. तामिळनाडूच्या राजकीय पक्ष द्रमुकचाही उल्लेख आहे. मेलमध्ये म्हटले आहे की, “आम्ही प्रस्ताव ठेवतो की डॉ. एझिलन नागनाथन यांनी द्रमुकची सूत्रे हाती घ्यावीत.” यासोबतच, उदयनिधी स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांना अॅसिड हल्ल्याची धमकीही या मेलमध्ये देण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

मॉरिशसच्या पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ मंदिराला दिली भेट; रामलल्लाचेही घेणार दर्शन

सीपी राधाकृष्णन यांनी १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

राहुल गांधी स्वतःला संविधानापेक्षा वरचढ समजतात!

दिल्लीत चार बांगलादेशी घुसखोर ताब्यात!

मेलमध्ये म्हटले होते की, “हे एक अंतर्गत कट आहे याचा एजन्सींना अंदाजही लागणार नाही. उदाहरणार्थ, तुमच्या दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या स्फोटामुळे मागील खोट्या गोष्टींबद्दलच्या शंका दूर होतील. दुपारच्या नमाजानंतर लगेचच न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये हा स्फोट होईल.” मेल गंभीर असल्याने पोलिसांनी त्याची फॉरेन्सिक चौकशी सुरू केली आहे. मेल कोणत्या आयपी अॅड्रेस/सर्व्हरवरून पाठवला गेला, मेल हेडरमध्ये छेडछाड झाली आहे का यासारख्या बाबींवर तपास सुरू आहे. यासोबतच, मेलमध्ये नमूद केलेल्या नावांवरही सुरक्षा वाढवली जात आहे. आणि संबंधित चॅनेलना माहिती देण्यात आली आहे आणि प्रतिसाद मागवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा