30 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरक्राईमनामाऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

मारहाणीविरोधातच एफआयआर दाखल करण्याची मागणी आणि सर्व वकील संघटनांकडून तीव्र निषेध

Google News Follow

Related

बोरिवली वकील संघटना तथा बार असोसिएशनचे सदस्य ऍडव्होकेट पृथ्वीराज झाला यांना कांदिवली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विविध भागातील बार असोसिएशन्सनी तीव्र निषेध केला असून मुंबईतील सगळ्या बार असोसिएशनमध्ये या मुद्द्यावर प्रचंड संताप आहे. शुक्रवार १७ मार्च रोजी या घटनेच्या निषेधार्थ विविध न्यायालयात एक दिवस काम करणार नाही, असा निर्णयही बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे.

बॉम्बे सिटी सिव्हील आणि सेशन कोर्ट ऍडव्होकेट बार असोसिएशनचे सचिव समीर सरंबळकर यांनी या मारहाणीचा निषेध करत सगळ्या सदस्य असोसिएशन या विरोधात एक दिवसाचे काम बंद आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

शिंदे फडणवीस सरकारने लाल वादळ थोपवले

रशियन एस ४०० वर भारी होणारे भारताने विकसित केली हवाई संरक्षण यंत्रणा

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

‘चित्ता हेलिकॉप्टर’ कोसळले; पायलटचा शोध सुरू

यासंदर्भात बॉम्बे सिटी सिव्हील आणि सेशन कोर्ट ऍडव्होकेट बार असोसिएशनने एक बैठक घेऊन त्यात आपली भूमिका मांडली. या घटनेनंतर सदर पोलिस अधिकारी सहपोलिस निरीक्षक हेमंत गिते यांच्याविरोधात एफआय़आर दाखल झाला पाहिजे अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. गिते यांनी झाला यांना मारहाण केल्याच्या घटनेबद्दल सरंबळकर म्हणतात की, झाला यांनी आपली ओळख सांगितल्यावर सदर अधिकाऱ्याने त्यांना आणखी मारले, असाही आरोप करण्यात आला. ते या बैठकीत म्हणाले की, याचा निषेध होईलच पण ठराव असाही असेल की याविरोधात एफआयआर घ्यावा नाहीतर आपण एक दिवस काम बंद करू.

त्यानंतर सगळ्या ऍडव्होकेट्सनी एकत्र येत पोलिसांच्या या मारहाणीविरोधात कांदिवली पोलिस ठाण्याच्या बाहेर निषेधाच्या घोषणा दिल्या. कांदिवली पोलिस ठाण्यात जी मारहाण झाली त्या निषेधार्थ डीसीपींची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी जे आश्वासन दिले त्याचे पालन ते करतात की नाही हे पाहू, असे सरंबळकर म्हणाले.

सरंबळकर यांनी संघटनेतील सर्व वकिलांना संबोधित करताना सांगितले की, आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याला पोलिसांकडून कशी वागणूक मिळते, हे निगरगट्टतेचे उत्तम उदाहरण होते. तू साध्या कपड्यात होतास म्हणून कळले नाही, असा जो दावा अधिकाऱ्याकडून केला गेला ही बाब पटणारी नाही. मी वकील आहे असे ते म्हणाल्यावर तू वकील कोर्टात असशील असे सांगत कानाखाली मारल्या. किती वकील असतील तर ते घेऊन ये असेही म्हटले. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. वकिलांची ताकद आपण पोलिस ठाण्यात दाखवून दिली.

वांद्रे, अंधेरी, बोरिवली, दादर, माझगाव बार असोसिएशनच्या माध्यमातून या मारहाणीचा निषेध करून एक दिवस काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा