27 C
Mumbai
Friday, January 28, 2022
घरक्राईमनामाचक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या

चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या

Related

काही तरुण मंडळी प्रसिद्ध होण्यासाठी जीवघेणे स्टंट्स करत असतात. असाच एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अत्यंत जीवघेणा आणि क्रूर स्टंट्स करत आहे. हा तरुण दोरीच्या उड्या मारतात तसे सापाला हातात धरून उड्या मारत आहे. याबाबत सर्प मित्रांकडून आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सदर व्हिडीओ हा पालघर मधील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्हिडीओमधील तरुणांची बोलीभाषा ही पालघर मधील असून सदर तरुण पालघर मधील कुठला आहे याचा शोध सध्या सुरू आहे. तरुणाच्या हातात धामण जातीचा साप असून त्या सापासोबत दोरी उडी मारत त्यासोबत खेळत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून याबाबत सर्वच स्तरांवरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश

अबब! भटक्या कुत्र्यांना खायला घातले म्हणून एवढा दंड?

राज्य परीक्षा अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

तरुणाकडून स्वतःच्या जीवाशी आणि सर्पाच्या जीवाशी खेळ सुरू असून त्याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आता वन्यजीव संरक्षकाकडून जोर धरू लागली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,598अनुयायीअनुकरण करा
5,850सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा