27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरक्राईमनामारेल्वेच्या ट्रॅकवर त्याने ठेवले दगड !

रेल्वेच्या ट्रॅकवर त्याने ठेवले दगड !

Related

रेल्वेच्या आसपास असलेल्या वस्त्यांमधून रेल्वे ट्रॅकवर अडथळे निर्माण करण्याचे काम अनेकवेळा होत असते. काहीवेळा ट्रॅकवर लाकूड टाकून रेल्वेच्या मार्गात अडथळे आणले जातात तर काहीवेळा दगड टाकून रेल्वेमार्ग बंद करण्याचा प्रयत्न होतो.

अशीच एक घटना डोंबिवली ते ठाकुर्ली या स्थानकांच्या दरम्यान घडली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर छोटे दगड ठेवल्याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. या मुलाने खोडसाळपणाने हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कर्जत लोकलच्या मोटरमनला रुळावर दगड ठेवल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत लोकल थांबवत या बाबत रेल्वेला माहिती दिली व हा प्रकार उघडकीस आला.

हे ही वाचा:

मुंबईवर नामुष्की; ओमानने जिंकली मालिका

काँग्रेसच्या नसीम खान यांनी लांडेंविरोधात केलेल्या याचिकेत उद्धव ठाकरेंचाही उल्लेख

संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत

उड्डाणपूल झाले खड्ड्यांनी बेजार

सदर प्रकारची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रेल्वे रुळावरील छोटे दगड बाजूला ठेवले. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून दगड कोणी ठेवले याचा तपास पोलीस करत होते.या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा