35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाबीरभूम जळीतकांडप्रकरणातील चार जण मुंबईत सापडले

बीरभूम जळीतकांडप्रकरणातील चार जण मुंबईत सापडले

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये झालेल्या ८ जणांच्या जळीतकांडातील चार आरोपींना सीबीआयने बेड्या ठोकल्या असून हे चौघेही मुंबईत सापडले आहेत. सीबीआयकडून मुंबईतून ४ जणांना अटक केल्याचे वृत्त असून या चौघांची नावे बाप्पा एसके उर्फ साल मोहम्मद, साबू  शेख  उर्फ सार्दिल, ताज मोहम्मद उर्फ चांद, सेराजुल एसके उर्फ पोल्टू.

चार आरोपींची या जळीत कांडातील नेमकी भूमिका काय हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये पश्चिम बंगालला हे हत्याकांड झाले होते. त्यात ८ जणांना जाळून ठार मारण्यात आले होते.

सीबीआयने या चारही जणांचे मोबाईल टॉवर लोकेशन शोधले आणि त्यांच्यावर झडप घातली. हे चौघेही पश्चिम बंगालमधून २२ मार्चलाच पळाले होते आणि मुंबईत लपून बसले. आता सीबीआयने गुरुवारी कोलकाता उच्च न्यायालयात प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर केला आहे. त्यात सीबीआयने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असेही नमूद केलेले आहे.

गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान तृणमूलचे उपाध्यक्ष प्रधान भादू शेख यांच्या हत्येचे प्रकरणही सीबीआयकडे सुपूर्द करण्याची मागणी करण्यात आली, पण बंगाल सरकारने सांगितले की, राज्य सरकार या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयकडे चौकशी देण्याची गरज नाही.

हे ही वाचा:

आजार बरा करण्याचे आमिष दाखवत विधवा महिलेचे जबरदस्ती धर्मांतर!

म्हणून श्रीलंकेच्या क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

भुजबळ म्हणतात Money Laundering कायदा हटवा…

..तर तो मोस्ट वॉन्टेड निसटला नसता

 

भादू शेखच्या हत्येनंतर बंगालमध्ये वातावरण तापले. रामपुरहटमध्ये ही हत्या झाली. त्यानंतर रामपुरहटमध्ये आठ घरे जाळली ली. त्यात नऊ लोकांचा मृत्यू झाला. कोलकाता उच्च न्यायालयाने २५ मार्चला या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधी, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करून त्यांच्याकडून अहवाल मागितला होता. एसआयटीने २२ लोकांना अटक केली. त्यात तृणमूलचा ब्लॉक अध्यक्ष अनारुल हुसेनचाही समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा