31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरक्राईमनामाआफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या

आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या

दिल्ली न्यायालयाने आदेश वाचून दाखविला,

Google News Follow

Related

श्रद्धा वालकरच्या निर्घृण खून प्रकरणात दिल्ली न्यायालयाने तिचा मारेकरी आफताब पूनावाला याच्यावर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

आफताब पूनावालाने श्रद्धाची गळा दाबून हत्या करत नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ते नंतर वेगवेगळ्या ठिकाणी फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात त्याला अटक करण्यात आली आहे आणि आता त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे.

दिल्लीतील साकेत न्यायालयात आफताबला आणले गेले. तिथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराना कक्कर यांनी आदेश दिला.

आफताबचे वकील न्यायालयात उपस्थित होते. न्यायाधीश कक्कर यांनी आदेश वाचून दाखविला. न्यायाधीश म्हणाल्या की, १८ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता श्रद्धा वालकरचा तू खून केलास. हा गुन्हा ३०२ कलमांतर्गत शिक्षेस पात्र आहे. १८ मे ते १९ ऑक्टोबर या कालावधीत गुन्हा केल्याची जाणीव असतानाही तू पुरावे नष्ट कऱण्याच्या इराद्याने तिच्या शरीराचे तुकडे केलेस आणि छत्तरपूर तसेच अन्य ठिकाणी ते तुकडे टाकलेस. त्यामुळे तू पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केलेला आहेस. न्यायाधीशांनी आफताबच्या वकिलांना विचारले की, झालेल्या आरोपांनंतर तू स्वतःला दोषी मानतोस का, त्यावर वकील म्हणाले की, आम्ही यावर सुनावणी व्हावी अशी मागणी करत आहोत.

हे ही वाचा:

“‘सामना’मधील अग्रलेखाला महत्त्व देत नाही”

५० फुटांवरून बस कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू

जाळपोळ होत होती, भयंकर परिस्थिती होती, पण राज्य सरकारने मदतीचा हात दिला

सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई

आता १ जूनपासून या हत्याप्रकरणाची सुनावणी सुरू होईल.

जानेवारी महिन्यात दिल्ली पोलिसांनी या हत्येप्रकरणात ६६३६ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात न्यायवैद्यक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचाही समावेश होता. त्यात १०० जणांचे जबाब नोंदविण्यात आले होते.

या आरोपपत्रात आफताबवर आरोप करण्यात आला आहे की, श्रद्धा वालकरला आफताबने गळा दाबून मारले आणि तिच्या शरीराचे तुकडे केले. तीन आठवडे ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याने ते नंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतून फेकले. त्यातील काही तुकडे पोलिसांना सापडले आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
76,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा