30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामातीस्ताला नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती

तीस्ताला नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती

 एसआयटीच्या आरोपपत्रात तिस्ता सेटलवाडवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

Google News Follow

Related

गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांविरुद्ध अहमदाबाद न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात तिस्ता यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात गोवण्याचा सखोल कट रचण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. तीस्ताशिवाय माजी आयपीएस संजीव भट्ट आणि आरबी श्रीकुमार यांचाही सहभाग होता. नरेंद्र मोदींना तुरुंगात टाकण्यासाठी या तिघांचे प्रयत्न सुरु होते. एसआयटीने अहमदाबाद सत्र न्यायालयात शंभर पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपींवर भारतीय दंड संहितानुसार कलम ४६८, कलम १९४ आणि कलम २१८ अंतर्गत आरोप आहेत. शिक्षा टाळण्यासाठी खोटी माहिती रेकॉर्ड करण्यासह इतर तरतुदींनुसार आरोप लावले गेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना गोवण्यासाठी वकिलांची फौज कामाला लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून काल्पनिक कथा सांगून पीडितांच्या सह्या घेतल्या आणि जे लोक पाठिंबा द्यायला तयार नव्हते त्यांना धमक्याही देण्यात आल्या. माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांनीही एका साक्षीदाराला धमकी दिली होती.

आरोपपत्रात म्हटले आहे की, तीस्ता काँग्रेससोबत काम करत असे आणि मदत शिबिरांना भेट देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असे.ती पीडितांना प्रकरण राज्याबाहेर न्यायालयात नेण्यासाठी प्रवृत्त करत असे. याशिवाय तिने पीडितांच्या नावाने देणगी गोळा केल्याचेही सांगण्यात आले आहे. तीस्ता आणि संजीव भट्ट एकमेकांच्या संपर्कात होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी संपली पाहिजे, अशा हेतूने त्यांनी हे कृत्य केले होते.

हे ही वाचा:

तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?

मुंबई विमानतळाने कोरोनानंतर हाताळले विक्रमी १ लाख ३० हजार प्रवासी

गल्लीतले मोदी आणि दिल्लीतले अरविंद सावंत

लष्करातून ब्रिटीश काळातील चिन्हे पुसणार

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५५ अधिकारी आणि राजकारण्यांना काही दिवसांपूर्वी क्लीन चिट मिळाली. त्यानंतर गुजरात एटीएसने सेटलवाडला यांच्या घरातून त्यांना अटक केली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या सेटलवाड यांची सर्वोच्च न्यायालयाच्या २ सप्टेंबरच्या आदेशानंतर अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणात श्रीकुमार आणि तिसरा आरोपी भट्ट कारागृहात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा