31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरक्राईमनामामीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

मीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Google News Follow

Related

मुंबई लगत असणाऱ्या मीरा- भाईंदर परिसरात ३८ वर्षीय चिकन शॉप मालकाने साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चिकन शॉपची तोडफोड करून आरोपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर निर्दशने करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संतप्त झालेल्या नागरिकांनी केली. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर मीरा भाईंदर मध्ये तणावपूर्ण शांत होती. याप्रकरणी नवघर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध लैगिंग अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीचे वय ४ वर्षे ९ महिने असून आपल्या कुटुंबासह मीरारोड येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असून  पीडितेच्या वडिलांचे घराशेजारीच सलून आहे. सलूनच्या शेजारी आरोपी मोहम्मद इमरान मोहम्मद दराज खान (३८) याचे चिकन शॉप असून तो राहण्यास देखील त्याच परिसरात आहे. वडिलांच्या दुकानाशेजारी आरोपीचे शॉप असल्यामुळे पीडिता आरोपीला ओळखत होती. ७ एप्रिल रोजी सायंकाळी पीडित मुलगी ही बराच वेळ घराबाहेर असल्यामुळे तिचे वडील शोधत शोधत चिकन शॉप जवळ आले असता पीडित मुलगी ही चिकन शॉप मध्ये आरोपी सोबत असल्याचे आढळले. वडिलांनी तिला ताब्यात घेतले आणि चिकन शॉप मालकावर संशय येत असल्यामुळे मुलीकडे चौकशी केली. तेव्हा ती खूप घाबरली होती.

आई वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता ‘अंकलने मेरे साथ गंदी हरकत किया है. अंकल धमकी दि है की पापा और मम्मी को मार डालेंगे, असे तिने वडिलांना सांगितले. चिकन शॉप मालकाने धमकी दिल्यामुळे तसेच बदनामीला घाबरून आई वडिलांनी देखील याची जास्त वाच्यता केली नाही. परंतु रविवारी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे या घटनेची माहिती परिसरात पसरली. संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी एकत्र येऊन आरोपीला चोप देत त्याच्या दुकानाची तोडफोड करून त्याला नवघर पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे ही वाचा:

जातीचा खुुळखुळा, करी देश खिळखिळा!

अरविंद केजरीवालांचा तिहारमधील मुक्काम लांबला; न्यायालयीन कोठडीत वाढ

उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांचा भाजपमध्ये प्रवेश!

के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

सदर घटनेत पीडित मुलगी व आरोपी  वेगवेगळ्या धर्माचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारनंतर काहींनी चिकन विक्रेत्याच्या दुकानाची तोडफोड केली होती. तर हिंदुत्ववादी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते नवघर पोलीस ठाण्याबाहेर एकत्र आले असून आमदार गीता जैन आणि भाजप नेते रवी व्यास यांनी आरोपीवर कडक कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पोलिस प्रयत्न करतील, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपली निर्देशने मागे घेतली.

या प्रकरणी नवघर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा