36 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामाकाँग्रेस आमदाराला हिट अँड रन प्रकरणी अटक

काँग्रेस आमदाराला हिट अँड रन प्रकरणी अटक

सोत्रिजाजवळ हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. गाडी, ​​बाईक आणि ऑटो रिक्षा यांच्यात भीषण अपघात हा झाला

Google News Follow

Related

गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील सोत्रिजाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेले तीन जण एकाच कुटुंबातील आहेत. गुरुवार, ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा हा अपघात झाला. दरम्यान, ही गाडी पूनमभाई परमान यांचे जावई काँग्रेस आमदार केतन पादियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

सोत्रिजाजवळ हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. गाडी, ​​बाईक आणि ऑटो रिक्षा यांच्यात भीषण अपघात हा झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील गाडी काँग्रेस आमदार केतन पाडियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. केतन पाडियार हे काँग्रेसच्या आमदार पूनमभाई परमान यांचे जावई आहेत. या अपघातानंतर पोलिसांनी आमदार केतन पाडियार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटकदेखील करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

कुर्ल्याचे दोघे मिठी नदीत बुडाले

‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

हा अपघात भीषण असून ऑटोमधील चार आणि दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. कार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा