30 C
Mumbai
Saturday, November 2, 2024
घरक्राईमनामाउत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या 'सिमेंट स्लीपर'

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या ‘सिमेंट स्लीपर’

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरु

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याची घटना समोर आली आहे. रायबरेली-प्रयागराज रेल्वे विभागातील लक्ष्मणपूर येथे रेल्वे रुळावर ‘सिमेंटचे स्लीपर’ ठेवण्यात आल्याचे समोर आले. या मार्गावरून मंगळवारी (८ ऑक्टोबर) रात्री उशिरा मालगाडी जाताना सिमेंट स्लीपरला धडकली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सतना येथून सिमेंट क्लिंकर घेऊन कुंदनगंज मालगाडी रायबरेलीकडे येत असताना लक्ष्मणपूर आणि दरियापूर स्थानकांदरम्यान रेल्वे क्रॉसिंग क्रमांक १५ सी जवळ ट्रॅकवर ठेवलेल्या सिमेंटच्या स्लीपरला मालगाडी अचानक धडकली. मोठा आवाज ऐकून चालकाने मालगाडी थांबवली, यानंतर त्याने रेल्वे रूळावरील स्लीपर काढला आणि रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी मालगाडी जवळपास २० मिनिटे तिथेच उभी होती.

हे ही वाचा : 

काँग्रेस, पवार, ठाकरेंनी शस्त्रे परजली होती, पण आता सगळे चिडीचूप!

लालू प्रसाद यांच्या नातेवाईकाकडून २५ कोटींची मालमत्ता जप्त!

जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमधून दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण

घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर बोपदेव घाट परिसर पाहणीचा देखावा कशासाठी?

यानंतर उंचाहर आरपीएफचे पथक घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला. यावेळी असा संशय व्यक्त केला की, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने लगतच्या शेतात सिमेंटचे स्लीपर टाकण्यात आले होते आणि ते सिमेंट स्लीपर अराजकवाद्यांनी ट्रॅकवर ठेवले असावेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा