29 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरक्राईमनामासीबीआयकडून निवृत्त न्यायमूर्तींचा भ्रष्टाचार उघड

सीबीआयकडून निवृत्त न्यायमूर्तींचा भ्रष्टाचार उघड

या पूर्वीही होते भ्रश्टाचाराचे आरोप

Google News Follow

Related

अलाहाबादच्या निवृत्त न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला यांच्यावर बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी सीबीआयकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे त्यांचा काळा पैसा उघड झाला आहे. निवृत्त न्यायधीशांवर भ्रष्टाचाराचा आरोप असून त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.एन. शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपावरून एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ आणि २०१९ दरम्यान सुमारे अडीच कोटींची  बेहिशेबी  मालमत्ता  जमवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायमूर्तींनी आपला काळा पैसा हा दोन ट्रस्ट, एक फाऊंडेशन, आणि रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये काळ्याचा पांढरा केला आहे.

निवृत्त  न्यायमूर्तीं शुक्ला  ह्यांच्याकडे अनेक पुराव्यांच्या आधारावर  सीबीआयच्या  हाती त्यांनी अडीच कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. एक एप्रिल २०१४  ते सहा डिसेंबर २०१९ या संपूर्ण कालावधीत सुमारे चार पूर्णांक सात कोटी रुपयांची संपत्ती कमवून खर्च केली.  दरम्यान,या कालावधीत शुक्ला यांचे उत्पन्नाच्या  एकूण उत्पन्न फक्त दिड कोटी रुपये होते. म्हणूनच शुक्ला यांच्याकडे हि बेहिशेबी मालमत्ता आहे  हे  सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे. बुधवारी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये हे नमूद केले आहे कि, अलाहाबाद  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला सैदीन तिवारी यांना  तर दुसरी पत्नी सूचिता तिवारी  यांच्या नावाखाली अवैध पैसा कमावला आहे  असा दावाच त्यांच्या दुसऱ्या पत्नीने न्यायालयात केला आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

निवृत्त न्यायमूर्ती  एस. एन. शुक्ला यांच्या घरी , शुक्लांच्या दुसऱ्या बायकोच्या लखनौ येथील गोल्फ सिटी भागातील निवासस्थानात आणि अमेठी येथील त्यांच्या मेहुण्याच्या निवासस्थानी झडती  घेतल्याचे  सीबीआयने  सांगितले आहे. शुक्ला यांच्या मोबाईलचा डेटा काढण्यात आला असून त्यांचा सूचित तिवारीशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. न्यायमूर्ती शुक्ला यांच्या पहिल्या पत्नीच्या नावावर अनेक मालमत्ता असल्याचे तपासात उघड झाले आहे.  शुक्ला  यांच्यावर भ्रष्टाचाराचा हा दुसरा आरोप असून लखनौच्या प्रसाद इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेसशी संबंधित न्यायालयीन भ्रष्टाचाराच्या तपासात शुक्ला यांच्याविरुद्ध २०२१  मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,884चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
65,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा