नालासोपाऱ्यात ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. दीपक जोगडिया (वय ३५) आणि कांचन सोळंकी (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही नालासोपारा पश्चिमेतील हनुमान नगर परिसरातील ‘साई महिमा’ या इमारतीतील चौथ्या मजल्यावर, खोली क्रमांक ४०१ मध्ये एकत्र राहत होते. २०२२ पासून ते ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये होते. दीपक जोगडिया हा विवाहित असून त्याला बारा वर्षांचा मुलगा आहे. पत्नीशी वाद झाल्याने तो प्रेयसी कांचनसोबत राहत होता, असे समजते.
हे ही वाचा:
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके: स्वातंत्र्याची पहिली जाज्ज्वल्य ज्योत
मलेशियाच्या समुद्र किनाऱ्यावर राहुल गांधी तृप्त झाले नव्हते म्हणून …
२१ क्विंटल फुलांच्या हारांची सजावट, १० लाखांहून अधिक दिव्यांनी उजळणार गंगा घाट
रविवारी रात्री उशिरा दोघांनी राहत्या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून नालासोपारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
दोघेही मूळचे मुंबईतील आर्थर रोड परिसरातील असून सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते.







