बिहारमधील बेगुसराय दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्थानिकांसोबत मासेमारी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर त्यांच्यावर टीका होत असतानाचं आता केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांना त्यांच्या अलीकडील मलेशिया दौऱ्याने समाधान मिळालेले नाही, म्हणून बिहार निवडणूक दौऱ्यादरम्यानही, त्यांना डुबकी मारून मासे पकडण्यापासून रोखता आले नाही. एक्सवरील एका पोस्टमध्ये, गिरीराज सिंह यांनी लिहिले की, “असे दिसते की मलेशियाचे रिसॉर्ट्स आणि समुद्रकिनारे तुम्हाला तृप्त करू शकले नाहीत, म्हणून आता बिहारमधील निवडणूक दौऱ्यादरम्यानही, राहुल गांधी हे स्वच्छ पाणी पाहून स्वतःला आवरू शकले नाहीत!” असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे.
याच मुद्द्यावरून लालू यादव यांचे मोठे पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत टीका केली होती. राहुल गांधी यांनी राजकारणी बनण्यापेक्षा स्वयंपाकी (आचारी) बनायला हवे, असा खोचक सल्ला त्यांनी दिला. जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादव यांनी राहुल गांधींबद्दल म्हटले की, “राहुल गांधी यांचे काम मोटारसायकल चालवणे आणि प्रदूषण करणे आहे. ते त्यांचे संपूर्ण आयुष्य मासेमारी करण्यात घालवतील. देश अंधारात बुडेल. जलेबी तळणे, मासे पकडणे, अशी कामे ते करत राहतील. ते स्वयंपाकी असायला हवे होते, राजकारणात का आले?” अशी खोचक टीका तेज प्रताप यादव यांनी केली आहे.
हेही वाचा..
नऊ राज्ये, तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजपासून SIR 2.0 ला सुरुवात! कशी असेल प्रक्रिया?
“भारतीय राजकारणात घराणेशाहीची जागा गुणवत्तेने घेण्याची वेळ आलीये!”
२१ क्विंटल फुलांच्या हारांची सजावट, १० लाखांहून अधिक दिव्यांनी उजळणार गंगा घाट
जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने केंद्राकडे सुचवल्या महत्त्वाच्या सुधारणा
शनिवारी राहुल गांधी बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी बेगुसरायला गेले होते. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर त्यांनी मच्छिमारांची भेट घेतली आणि ते एका तलावात उतरले. तेथे त्यांनी स्थानिक मच्छिमारांसोबत पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली. यावरून विरोधकांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागले.







