बांगलादेशी कट्टरपंथीयांनी प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मुहम्मद युनूस सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केल्यानंतर, प्रशासनाने या मागणीसमोर गुडघे टेकल्याचे समोर आले आहे. संबंधित निर्णयाला “इस्लामिक नसलेला अजेंडा” असे म्हणत काही महिन्यांनी, अंतरिम प्रशासनाने बांगलादेशी बांगलादेशी कट्टरपंथीयांसमोर हार मानल्याचे उघड झाले आहे.
बांगलादेशच्या प्राथमिक आणि जनशिक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये संगीत शिक्षकांसाठी नव्याने निर्माण केलेली पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे देखील रद्द केली आहेत, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिली आहेत. “गेल्या ऑगस्टमध्ये जारी केलेल्या नियमांमध्ये पदांच्या चार श्रेणी होत्या, परंतु दुरुस्तीमध्ये दोन श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. संगीत आणि शारीरिक शिक्षणासाठी सहाय्यक शिक्षकांची पदे नवीन नियमांमध्ये नाहीत,” असे मंत्रालयाचे अधिकारी मसूद अख्तर खान म्हणाले. धार्मिक गटांच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे का, असे विचारले असता, अख्तर खान यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
युनूस प्रशासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, जिथे त्यांनी इस्लामी दबावापुढे झुकल्याचे दिसून आले आहे. बांगलादेशात, एकेकाळी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळात नियंत्रणात राहिलेले इस्लामी आता युनूस यांच्या काळात अधिक आक्रमक वाटत असल्याचे बोलले जात आहे.
इस्लामवाद्यांनी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये फक्त धार्मिक शिक्षकांनाच नियुक्त करण्याची मागणी केली होती आणि जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला होता. त्यांनी संगीत आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियुक्ती जबरदस्तीने करण्यात आल्याचे आणि असंबद्ध असल्याचे म्हटले होते. सप्टेंबरमध्ये जातीय ओलामा मशयेख आयमा परिषदेने आयोजित केलेल्या इस्लामी मेळाव्यात, ज्यामध्ये जमात-ए-इस्लामी, इस्लामी आंदोलन बांगलादेश, खेलफत मजलिश, बांगलादेश खेळफत मजलिश आणि बांगलादेश खेळफत आंदोलन या संघटनांचे कट्टरपंथी नेते उपस्थित होते, कट्टरपंथीयांनी असा दावा केला की हे पाऊल भविष्यातील पिढीला अविश्वासू बनवण्याच्या आणि शालेय मुलांना बिघडवण्याच्या उद्देशाने असलेल्या नास्तिक तत्वज्ञानाशी अप्रत्यक्षपणे जोडलेले आहे.
हेही वाचा..
मलेशियाच्या समुद्र किनाऱ्यावर राहुल गांधी तृप्त झाले नव्हते म्हणून …
नऊ राज्ये, तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजपासून SIR 2.0 ला सुरुवात! कशी असेल प्रक्रिया?
“भारतीय राजकारणात घराणेशाहीची जागा गुणवत्तेने घेण्याची वेळ आलीये!”
२१ क्विंटल फुलांच्या हारांची सजावट, १० लाखांहून अधिक दिव्यांनी उजळणार गंगा घाट
मेळाव्याला संबोधित करताना इस्लामी आंदोलन बांगलादेशचे प्रमुख सय्यद रेजाउल करीम म्हणाले, “जेव्हा आम्ही लहानपणी धार्मिक शिक्षण घेत होतो, तेव्हा हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगळे शिक्षक होते. आम्ही त्यांच्या हाताखाली शिक्षण घेत होतो. पण आता, तुम्ही संगीत शिक्षकांची नियुक्ती करू इच्छिता? ते काय शिकवतील? तुमचे हेतू काय आहेत? तुम्ही आमच्या मुलांना अनादरशील, बेशिस्त आणि चारित्र्यहीन बनवू इच्छिता? आम्ही ते कधीही सहन करणार नाही.” जर युनूस प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर बांगलादेशातील इस्लामप्रेमी आणि धर्मप्रेमी लोकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले जातील, असा इशारा त्यांनी दिला होता.







