काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका आंतरराष्ट्रीय प्रकाशनासाठी लिहिलेल्या लेखात भारतातील घराणेशाही राजकीय संस्कृतीवर टीका केली. तसेच ही संस्कृती देशाच्या लोकशाहीसाठी एक गंभीर धोका असल्याचेही त्यांनी म्हटले. शशी थरूर यांनी असे प्रतिपादन केले की, भारताने घराणेशाहीऐवजी गुणवत्तेची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. “जेव्हा राजकीय सत्ता क्षमता ही वचनबद्धता किंवा तळागाळातील सहभागापेक्षा वंशावळीने निश्चित केली जाते, तेव्हा प्रशासनाची गुणवत्ता कमी होते. तसेच जेव्हा उमेदवारांची मुख्य पात्रता ही त्यांचे आडनाव असते तेव्हाही समस्या मोठी असते,” असे थरूर यांनी प्रोजेक्ट सिंडिकेटमधील ‘इंडियन पॉलिटिक्स आर अ फॅमिली बिझनेस’ या त्यांच्या लेखात म्हटले आहे. इंडिया टुडे यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
शशी थरूर यांनी म्हटले आहे की, “भारतात घराणेशाहीची जागा आता गुणवत्तेने घेण्याची वेळ आली आहे. यासाठी मूलभूत सुधारणांची आवश्यकता असेल. ज्यात कायदेशीररित्या अनिवार्य कार्यकाळ मर्यादा लादण्यापासून ते अर्थपूर्ण अंतर्गत पक्ष निवडणुका आवश्यक असतील, तसेच मतदारांना गुणवत्तेच्या आधारे नेते निवडण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील,” असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..
२१ क्विंटल फुलांच्या हारांची सजावट, १० लाखांहून अधिक दिव्यांनी उजळणार गंगा घाट
जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने केंद्राकडे सुचवल्या महत्त्वाच्या सुधारणा
ना लालू प्रसाद, ना सोनिया गांधी यांचा मुलगा मुख्यमंत्री बनेल
एनडीए सरकार म्हणजे महिलांच्या समृद्धीची हमी
या लेखात थरूर यांनी नेहरू- गांधी कुटुंब हे एक उत्तुंग राजकीय घराणे म्हणून अधोरेखित केले आहे. ज्यांनी अनेक दशकांपासून भारतीय राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे. जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी आणि सध्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांची उदाहरणे देत थरूर यांनी नमूद केले की या कुटुंबाचा वारसा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी खोलवर गुंतलेला आहे. यामुळे राजकीय नेतृत्व हा जन्मसिद्ध हक्क असू शकतो ही कल्पनाही यामुळे दृढ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही कल्पना भारतीय राजकारणात प्रत्येक पक्षात, प्रत्येक प्रदेशात आणि प्रत्येक स्तरावर शिरली आहे, असे थरूर पुढे म्हणाले. त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर बिजू जनता दलाची सूत्रे हाती घेतली; बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, जे शिवसेनेच्या (यूबीटी) गटातून समोर येत आहेत, अशी उदाहरणे दिली. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि शिरोमणी अकाली दल यासारख्या पक्षांचाही उल्लेख केला आहे.







