तो बहसुमा पोलिस स्टेशन परिसरातील मोहम्मदपूर साकिस्त गावचा रहिवासी होता. नऊ महिन्यांपूर्वी त्याने एका पाच वर्षांच्या मुलीवर हल्ला केला होता. तो यापूर्वी एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात दोषी ठरला होता आणि त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती.
तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा निष्पाप मुलीवर अत्याचार केला. पोलीस नऊ महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. शनिवारी रात्री त्याने पीडितेच्या घरावर गोळीबार केला आणि केस मागे न घेतल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हे ही वाचा :
एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, पोलिस काल रात्रीपासून आरोपीचा शोध घेत होते. सोमवारी सकाळी सरूरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस, सरधना बिनोली रस्त्यावर तपासणी करत असताना त्यांना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून एक तरून जाताना दिसला. त्याला थांबण्याचा इशारा केला तेव्हा त्याने पिस्तूलने गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. चकमकीदरम्यान, एक गोळी पोलिसांच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागली आणि तो थोडक्यात बचावला. पोलिसांनी जखमी गुन्हेगाराला सरूरपूर सीएचसीमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.







