उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील खेकरा पोलीस ठाणे परिसरातील एका महाविद्यालयात धार्मिक घोषणांवरून मोठा गोंधळ उडाला. एका विद्यार्थ्याने “आय लव्ह मोहम्मद” म्हणण्यास नकार दिल्याने त्याला दुसऱ्या विद्यार्थ्याने आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
पीडित विशाल याने सांगितले की, आरोपी रिहान आणि त्याचे मित्र कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर धार्मिक घोषणा देण्यासाठी वारंवार दबाव आणत असत. घटनेच्या दिवशी रिहानने त्याच्या काही बाहेरील मित्रांना कॉलेजजवळील मशिदीत बोलावले. त्यानंतर त्यांनी विशालचा रस्ता अडवला आणि त्याला “आय लव्ह मोहम्मद” म्हणायला सांगितले. विशालने नकार दिल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे कॉलेजबाहेरच्या रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता.
विशाल म्हणाला की, “मी इंटर कॉलेजमध्ये शिकतो. परीक्षा देऊन निघत असताना रिहान कॉलेजबाहेर काही इतर मुलांसोबत उभा होता, त्यांचे चेहरे झाकलेले होते. मला “मी मोहम्मदवर प्रेम करतो” असे म्हणण्यास भाग पाडण्यात आले आणि जेव्हा नकार दिला तेव्हा मारहाण करण्यात आली. रिहान हे अनेकदा करत आहे.”
पीडित विशाल याच्या कुटुंबाने खेकरा पोलिस ठाण्यात रिहान आणि त्याच्या अज्ञात साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा..
ट्रम्प यांचा ‘मी पणा’ सुरूच! आता मी अफगाण-पाक युद्ध थांबवणार
कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणी सात ठिकाणी छापेमारी
युद्धबंदी होताच ट्रम्प इस्रायल दौऱ्यावर
गुरुग्राममध्ये संयुक्त पथक-दोन शार्पशूटर यांच्यात चकमक
दरम्यान, पीडितेचा नातेवाईक किरण प्रसाद म्हणले, विशाल माझा भाचा आहे. रिहान त्याच्या कॉलेजजवळील मशिदीत काही मुलांसोबत उभा होता. “मी मोहम्मदवर प्रेम करतो” असे म्हणण्यास नकार दिल्याने त्यांनी त्याला मारहाण केली. आम्ही पोलिसांना कळवले आहे आणि तक्रार दाखल केली आहे.







