31 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरक्राईमनामाकफ सिरप उत्पादक श्रीसन फार्मास्युटिकल्सचा परवाना रद्द, कंपनीही बंद

कफ सिरप उत्पादक श्रीसन फार्मास्युटिकल्सचा परवाना रद्द, कंपनीही बंद

तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल विभागाची कारवाई

Google News Follow

Related

मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळे २२ बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त करत असताना कोल्ड्रिफ कफ सिरपचे उत्पादक श्रीसन फार्मास्युटिकल कंपनीचा उत्पादन परवाना तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल विभागाने सोमवारी रद्द करण्याची घोषणा केली. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, त्यांच्या कफ सिरप, कोल्ड्रिफमध्ये विषारी दूषित घटक, विशेषतः डायथिलीन ग्लायकोल (DEG) आढळल्याच्या तपासणीनंतर कंपनी अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे.

विभागाने तामिळनाडूमधील सर्व औषध उत्पादक युनिट्समध्ये व्यापक तपासणीचे आदेश दिले आणि सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. मध्य प्रदेशातील एसआयटीने ९ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये अटक केल्यानंतर न्यायालयाने श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल दोन वरिष्ठ औषध निरीक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे. तामिळनाडू सरकारने राज्यातील इतर औषध उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

तत्पूर्वी, भाजप नेते के अन्नामलाई यांनी तामिळनाडू सरकारवर प्रकरणाच्या हाताळणीबद्दल टीका केली. विशेष तपास पथकाने (एसआयटी) हस्तक्षेप केल्यानंतर राज्य सरकारने फक्त दोन औषध निरीक्षकांना निलंबित केले, यावर त्यांनी भाष्य केले. तामिळनाडू सरकारवर भ्रम निर्माण करण्याचा आणि जबाबदारी टाळण्याचा आरोप केला.

“कांचीपुरम येथील एका खाजगी औषध कंपनीने बनवलेल्या औषधामुळे मध्य प्रदेशात २३ लोकांचा आणि राजस्थानात तीन मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, तामिळनाडू सरकारने फक्त दोन औषध निरीक्षकांना निलंबित केले आहे आणि या प्रकरणात त्यांचा कोणताही संबंध किंवा जबाबदारी नाही असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यावेळी, एजन्सीने निर्णय घेतला आहे की भारतात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक औषधाची मंजुरीपूर्वी अनिवार्य चाचणी करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

हमास हल्ल्यातून बचावलेल्या इस्रायली युवकाने स्वतःला घेतले पेटवून

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ हा चुकीचा निर्णय

ठेकेदारीच्या पैशावरून वाद — हातगाडी चालकाचे अपहरण करून खून!

गुरुग्राममध्ये संयुक्त पथक-दोन शार्पशूटर यांच्यात चकमक

याव्यतिरिक्त, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक निर्देश जारी केला आहे, ज्यामध्ये कच्च्या मालाच्या आणि तयार औषधी सूत्रांच्या चाचणीसाठी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स नियम, १९४५ चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा