31 C
Mumbai
Sunday, May 28, 2023
घरक्राईमनामाडी - कंपनी एनआयएच्या रडारवर 

डी – कंपनी एनआयएच्या रडारवर 

दाऊदच्या हस्तकाच्या मुंबईतील ६ ठिकाणी छापेमारी 

Google News Follow

Related

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या बनावट नोटा प्रकरणाच्या कारवाईत डी- कंपनीचे थेट कनेक्शन आढळून आल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या पथकाने बुधवारी दाऊदच्या हस्तकाच्या मुंबईतील ६ ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत एनआयएला डिजिटल उपकरणे, महत्वाचे कागदपत्रे आणि धारदार शस्त्रे सापडली आहेत.

नोव्हेंबर २०२१ मध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय चलनातील बनावट नोटांसह रियाज आणि नासिर या दोघांना अटक केली होती. या दोघांजवळून ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ५०० आणि २ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. रियाज आणि नासिर हे दोघे मुंबईत राहणारे असून त्यांनी या नोटा भारतात वितरित करण्यासाठी आणल्या होत्या.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात तपास सुरू केला असता या गुन्ह्यात अंडरवर्ल्ड तसेच दहशतवादी संघटनेचा सबंध आढळून आला होता. नासिर आणि रियाज हे दोघे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद टोळीशी संबंधित असून दाऊद याचे बनावट नोटाच्या काळ्या धंद्यात थेट कनेक्शन असल्याचे समोर आले.

एनआयए ने ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये वेगळा गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्यावर तपासात दाऊद टोळीचे थेट कनेक्शन आढळून आले. या अनुषंगाने एनआयए ने बुधवारी रियाज आणि नासिर यांच्या मुंबईतील घरे आणि कार्यालय अश्या ६ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत एनआयएच्या हाती डी -कंपनी संबंधित काही पुरावे तसेच डिजिटल उपकरणे, बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारे कागद, तसेच काही महत्वाचे कागदपत्रे आणि धारदार शस्त्रे सापडली आहेत.

हे ही वाचा:

शिक्षकांनी लावला डोक्याला हात, उत्तर पत्रिकेत ‘पुष्पा’चे संवाद

रक्ताच्या पिशव्या गरजूंपर्यंत उडत गेल्या!

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, हे न्यायालयाचे मत महत्त्वाचे!

आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केले!

एनआयएच्या तपासात रियाज आणि नासीर हे दोघे थेट दाऊद याच्या संपर्कात होते अशी माहिती समोर येत असून दाऊद इब्राहिम बनावट नोटांच्या सिंडिकेट चालवत या बनावट नोटा भारतातील वितरित करत असल्याची माहिती समोर येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,020अनुयायीअनुकरण करा
74,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा