37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरक्राईमनामाबेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

Google News Follow

Related

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या १२ वर्षांचा मुलाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी वडाळा शांती नगर, खाडीजवळ सापडला आहे.

मुलाची हत्या करून मुलाचे मुंडके धडावेगळे करून मृतदेह खाडीजवळ फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार मारेकरी हा ओळखीचा असून त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, परंतु तोंड धुण्याच्या निमित्त करून पोलीस ठाण्यातून त्याने पोबारा केला तेव्हा पासून पोलीस त्याच्या मागावर आहे.

वडाळा टिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या उत्तर भारतीय कुटुंबातील १२ वर्षाचा मुलगा २८ जानेवारी रोजी बाहेरून जाऊन येतो असे आईला सांगून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता. रात्री उशिर होऊन देखील मुलगा घरी न आल्यामुळे कुटुंब चिंतेत होते, त्यांनी परिसरात मुलाचा शोध घेतला परंतु मुलगा कुठेही आढळला नाही.

दुसऱ्या दिवशी कुटुंबाने वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाच्या शोध घेण्यात येत होता, दरम्यान अपहरण झालेल्या १२ वर्षाच्या मुलाच्या घराशेजारी भाड्याने राहण्यास आलेल्या बिपुल शिकारी या संशयिता सोबत मुलाला शेवटचे बघितले होते तसेच एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील संशयित आरोपी सोबत मुलगा आढळून आला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान वडाळा टिटी पोलिसांनी संशयित आरोपी बिपुलला चौकशीसाठी पोलीस ठाण्याचे आणले होते, त्याच्याकडे बेपत्ता मुलाबाबत चौकशी सुरू असताना त्याने त्याच्या डोक्यातील जखमांचे टाके काढले असता त्याचा चेहरा रक्ताने माखला.

या दरम्यान चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने आरोपीला चेहरा धुवून येण्यास सांगितले असता,आरोपीने तेथून पळ काढला, आरोपीने पळ काढल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला, व पोलिसांनी तात्काळ त्याच्या शोध सुरू केला,परंतु तो सापडला नाही.

दरम्यान बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घेण्यात येत असताना वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्व मुक्त मार्गाच्या पुला खाली खाडी जवळ पोलिसांना सोमवारी सायंकाळी एक मुडकेवल विरहित धड सापडले.

हे ही वाचा:

“५० वर्षे पवारांचे ओझे महाराष्ट्र वाहतो आहे”

हिटमॅन ऱोहित… अब की बार ६०० पार

कारागृहातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेनवॉशचा प्रयत्न!

आपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!

पोलिसांना सोमवारी धडासोबत मिळून आलेले हातातील कडे, टी शर्ट आणि चपला वरून मृतदेह बेपत्ता मुलाचा असल्याचे उघड झाले आहे, मंगळवारी मुलाचे मुडके धड मिळालेल्या काही अंतरावर मिळाले आहे.

याप्रकरणी वडाळा टिटी पोलिसांनी अपहरण आणि हत्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुलावर लैगिंक अत्याचार करून हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा