छत्तीसगडमधील रायपूर येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी जोडप्याला अटक करण्यात आली आहे. दिलावर खान असे अटक केलेल्या घुसखोराचे नाव असून तो १६ वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात आला होता. एका वर्षानंतर त्याने त्याच मार्गाने सीमा ओलांडून त्याची पत्नी आणि मुलाला भारतात प्रवेश मिळवून दिला. ते रायपूरमध्ये राहण्यासाठी आले. याठिकाणी त्यांनी एका मुलीला जन्म दिला.
पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याने धक्कादायक माहिती सांगितली. भाड्याच्या घरात राहून त्याने त्या आधारावर भाडेपट्टा करार बनवला. या आधारावर त्याने पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट देखील बनवले. कुटुंबातील इतर सदस्यांकडेही सरकारी ओळखपत्रे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दिलावरची पत्नी परवीन खान आणि मुलीलाही ताब्यात घेतले आहे, ती अल्पवयीन आहे.
घुसखोर दिलावरने सांगितले त्त्याला आणखी एक मुलगा आहे, जो मलेशियाला आहे. त्याने सांगितले की, सुरवातीला त्याचा मुलगा रायपूरमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता. त्याच्याकडे पैसे मागितले म्हणून त्याने घर सोडले आणि निघून गेला. तीन वर्षांपूर्वी त्याने सांगितले की तो पुण्यात आहे. गेल्या वर्षी त्याने सांगितले की तो विवाहित आहे आणि त्याच्या सासरच्यांनी त्याला मलेशियाला पाठवले आहे. दरम्यान, पोलिस त्याच्या मुलाचीही चौकशी करत आहेत.
हे ही वाचा :
उत्तर २४ परगण्यात ईडीचा व्यावसायिकाच्या घरी छापा
केदारनाथ : हेलिकॉप्टर बुकिंगच्या तारखा अजूनही नाहीतच !
हसन यांना योगामध्येही हिंदू-मुस्लिम दिसते
संभळ हिंसाचार प्रकरणात चार्जशीट दाखल
घुसखोर दिलावर खान आणि त्याच्या कुटुंबाला बनावट कागदपत्रे बनवण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये घरमालक, कागदपत्रे बनवण्याची शिफारस करणारे लोक आणि सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. घुसखोर दिलावर आणि त्याच्या कुटुंबाने रायपूरमध्ये ४ घरे बदलली आहेत. तो मजूर म्हणून काम करत असे आणि नंतर रस्त्याच्या कडेला एक गाडी उभी करून अंडे आणि बिर्याणी विकत असे. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत बांगलादेशी जोडप्याला अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरु आहे.
