33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामामहसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न

महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न

Google News Follow

Related

महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने गेल्या आठवड्यात लखनौ आणि मुंबई येथे मोठी कारवाई करत सोन्यासाच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडली आहे. सलग दोन वेळा डीआरआयने ही यशस्वी कारवाई करून दाखवली आहे. हवाई मार्गाने संघटीतपणे ही सोन्याची तस्करी करण्याचे प्रयत्न सुरु होते. ज्यात सोने लपवून नेण्याची सामान्य पद्धत वापरली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी अचूक रुपरेषा निश्चित केली. त्यानुसार, ६ मे रोजी, दुबईहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर कार्गो कॉम्प्लेक्स, येथे आलेल्या मालाची तपासणी केली. आयात माहिती कागदपत्रांत याची नोंद, “वेगवेगळे सुटे भाग आणि ड्रम प्रकाराचे सफाई मशीन” म्हणून घोषित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?

ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार

‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!’ राज ठाकरेंचा लेटरबॉम्ब

संगीताचा ‘अंतर्ध्वनी’ टिपणारा संगीतपूजक

परंतु काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, ३.१० कोटी रुपये मूल्य असलेले ५.८ किलो सोने चकत्यांच्या आकाराच्या स्वरूपात आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटर्समध्ये लपवून ठेवलेले आढळले. हा आयातदार दक्षिण मुंबईत असून त्याला तातडीने कारवाई करून अटक करण्यात आली आहे. या आयातदाराला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लखनऊमध्ये देखील डीआरआय अधिकाऱ्यांनी मुंबईतील या जप्तीच्या एक दिवस आधी दिनांक ५ मे रोजी आणखी एका जप्तीची कारवाई केली. त्या प्रकरणात देखील,डीआरआयने लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये “इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीन” असल्‍याचे सांगितलेल्‍या आयात माल पकडला आणि तिथेही मशिनमध्‍ये सोन्याच्‍या चकत्‍या लपविल्‍याचे आढळले. एकूण ५.२ किलो सोने, ज्याचे मूल्य २.७८ कोटी रुपये आहे, ते या प्रकरणांत जप्त करण्यात आले आहे.

तपासांच्या या मालिकेमुळे हवाई मालवाहू आणि कुरिअर मार्गाने मूळ परदेशी सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन कार्यपद्धती शोधण्यास मदत झाली आहे. अशा तपासण्यांमुळे डीआरआय(DRI) ची तस्करीच्या निरनिराळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची क्षमता मजबूत होत असते. या कालावधीत, महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्यांनी एकूण ८३३ किलो तस्करी करून आणलेले सोने जप्त केले आहे, ज्याचे मूल्य ४०५ कोटी रुपये इतके आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा