25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरक्राईमनामाअंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

२०० कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप

Google News Follow

Related

ईडीकडून अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत छापेमारी करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विकणारा अली असगर शिराझी याच्या विरोधात ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. अली असगर हा वाँटेड ड्रग्स लॉर्ड कैलाश राजपूतचा जवळचा सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, शिराझी याच्यावर २०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे.

ईडीने अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला असून ड्रग तस्कर अली असगर शिराझी याच्यासंबंधी छापेमारी केली आहे. हा अंधेरी परिसरात वास्तव्याला असून त्याचं घर आणि ऑफिस याठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे.

अली असगर शिराझीशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकण्यात आलेत आणि काही इतर ठिकाणी छापे अजुनही सुरू आहेत. एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या केटामाइनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य अली असगर शिराझी याला अटक केली होती.

मुंबई गुन्हे शाखेने याच वर्षी मे महिन्यात शिराझीला अटक केली होती. कुरिअर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डममध्ये ८ कोटी रुपये किमतींच्या केटामाइन आणि व्हायग्राची तस्करी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अली असगर शिराझी या वाँटेड व्यक्तीला दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावरुन पकडण्यात आलं होतं. गुन्हे शाखेनं त्याच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी आणि त्यानंतर त्याला यावर्षी ताब्यात घेण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

‘इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा’

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी सौरभ चंद्राकरच्या निकटवर्तीयाला अटक

मुंबईतील सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयकडून पर्दाफाश

पैसे घेऊन विचारले प्रश्न; खा. मोईत्रा यांच्यावर अदानी समूहाचे आरोप

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं १५ मार्च रोजी अंधेरी परिसरात छापा टाकून १५ किलो ७४० ग्रॅम केटामाइन आणि २३ हजारांहून अधिक व्हायग्राची पाकिटं जप्त केली होती. केटामाइनची किंमत ७ कोटी ८७ लाख रुपये, तर व्हायग्राची किंमत ५८ लाख रुपये होती. याप्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली होती. या टोळीचा म्होरक्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर कैलाश राजपूत असून, त्याच्यासह आणखी तिघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा