27 C
Mumbai
Sunday, February 25, 2024
घरक्राईमनामामुंबईतील सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयकडून पर्दाफाश

मुंबईतील सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयकडून पर्दाफाश

झवेरी बाजार येथे कारवाई

Google News Follow

Related

डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफार्श केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत झवेरी बाजार येथील दोन ठिकाणी सोन्याची तस्करी करत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

कारवाईमधील पहिल्या ठिकाणी, कायदेशीर खरेदीचा कोणताही पुरावा नसलेली आणि परदेशी शिक्का असलेली १ किलो सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. तर इथूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका ठिकाणी डीआरआयने छापेमारी केली. या घातलेल्या छाप्यात परदेशी बनावटीचे ७.०२२ किलो सोने आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले १ कोटी २२ लाख १० हजार रुपये (भारतीय चलन) ताब्यात घेण्यात आले आहे.

सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी आणखी चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यापैकी एका ठिकाणी सोने वितळवण्याचे काम सुरु असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे, या धाडींतून परदेशी बनावटीचे ४ कोटी ७८ लाख ७४ हजार ५४७ रुपये मूल्याचे तस्करी करून आणलेले ८.०२२ किलो सोने आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले १ कोटी २२ लाख १० हजार रुपये असा एकूण ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पैसे घेऊन विचारले प्रश्न; खा. मोईत्रा यांच्यावर अदानी समूहाचे आरोप

आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकलेल्या ऐश्वर्याला घर, नोकरीचे आश्वासन!

बेपत्ता इस्रायलींच्या नातेवाईकांनी नेतान्याहूंना सांगितले हृदयद्रावक प्रसंग

सचिन तेंडुलकरने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण

यापैकी एका ठिकाणचा व्यवस्थापक, जो या टोळीचा सक्रीय सदस्य आहे आणि ज्याच्याकडून परदेशी बनावटीचे सोने जप्त करण्यात आले, त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. टोळीतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा