28 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरराजकारणआता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’

आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’

कारस्थानी असणारा याह्या हा इस्रायलचा अभेद्य शत्रू

Google News Follow

Related

‘क्रूरतेचा चेहरा’ म्हणून ओळखला जाणारा, हमास या दहशतवादी संघटनेचा गाझाप्रमुख याह्या सिनवार हा इस्रायली सैनिकांनी लक्ष्य केलेल्या सर्वोच्च दहशतवाद्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्यामुळेच गाझा पट्टीच्या किनारी भागात आक्रमण करून त्याच्या नेतृत्वाखालील संघटनेचा निःपात करण्याचे लक्ष्य इस्रायली सैनिकांना देण्यात आले आहे.

 

हमासमधील एक क्रूर, कारस्थानी असणारा याह्या हा इस्रायलचा अभेद्य शत्रू मानला जातो. दोन दशकांहून अधिक काळ तो इस्रायलच्या तुरुंगात खितपत पडून होता. मात्र सन २०११मध्ये एकमेकांच्या देशांमधील कैद्यांची अदलाबदली करण्याच्या योजनेत त्याची सुटका करण्यात आली. सन २०१७मध्ये याह्या सिनवार गाझामधील दहशतवादी गटाचा नेता म्हणून उदयास आला. मात्र हमासचा हा सर्वोच्च नेता परदेशात वास्तव्य करतो. ‘याह्या सिनवार हा क्रूरतेचा चेहरा आहे,’ असे इस्रायली लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच यांनी सांगितले. ‘बिन लादेनप्रमाणेच तो या इस्रायलवरील हल्ल्यामागील सूत्रधार आहे. ही व्यक्ती आणि त्याची संपूर्ण टीम आमचे लक्ष्य आहे,’ असे कर्नल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ठाकरेंना दणका; शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारने केस जिंकली; महात्मा फुलेंच्या भिडेवाड्याचे होणार स्मारक

शरद पवारांचे निकटवर्ती, राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची ३१५ कोटींची संपत्ती जप्त

‘इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा’

सिनवार याचे वय ६०च्या आसपास आहे. तो दक्षिण गाझाच्या मुख्य शहर खान युनिसमध्ये वाढला. त्याने हमासची लष्करी तुकडी ‘अल माजद – अरेबिक’ स्थापन करण्यास मदत केली. तसेच, १९८७मध्ये हमासच्या स्थापनेसही मदत केली. त्याचे काम गटाची सुरक्षा शाखा चालवण्याचे होते. ज्यामध्ये नागरिकांची ‘नैतिकता’ तपासणे आणि इस्रायलशी सहयोग केल्याचा संशय असलेल्या पॅलेस्टिनींना शिक्षा करणे यांसारख्या कामांचा समावेश होता. त्याला १९८८च्या सुरुवातीस इस्रायली सैन्याने अटक केली आणि दोन इस्रायली सैनिकांना मारल्याबद्दल चारवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र २०११मध्ये त्याची सुटका झाल्यानंतर सहा वर्षांनी त्याची गाझामध्ये हमासचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आणि त्याची ताकद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

 

सन २०१५मध्ये हमास कमांडर महमूद इश्तीवी याचा छळ करण्यात आणि हत्येमागे त्याचा हात असल्याचे मानले जाते. या महमूत इश्तिवी याच्यावर समलैंगिक संबंध ठेवल्याचा आणि ‘नैतिक गुन्हे’ केल्याचा आरोप होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा