29 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरक्राईमनामाअविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

Related

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘रिअल इस्टेट किंग’ अविनाश भोसले यांना ईडीने समन्स बजावले आहे. आज (गुरुवार १ जुलै) रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले आहे. भोसले अंमलबजावणी संचलनालय कार्यालयात चौकशीला हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालाही ईडीने समन्स बजावले आहे. अमित भोसलेला उद्या (शुक्रवार २ जुलै) रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत. पुण्यातील एका जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे. ही जमीन सरकारी असल्यामुळे याबाबत पुण्यात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर हायकोर्टानेही अविनाश भोसले यांना चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागत आहे.

अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

हे ही वाचा:

अशा भ्याड हल्ल्याने बहुजन समाज घाबरणार नाही

पडळकरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भाजपा नेते आक्रमक

ठाकरे सरकारची उर्दू ‘हौस’

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

दरम्यान, अविनाश भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी झाली होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. २०१७ साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,940अनुयायीअनुकरण करा
40,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा