30 C
Mumbai
Wednesday, August 26, 2026
घरक्राईमनामामुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार

मुदत संपलेले मासे, अस्वच्छ किचन; बंगळुरूतील हाय-प्रोफाइल क्लबमधील प्रकार

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून कारवाई

Google News Follow

Related

बंगळुरूमधील नामांकित आणि हाय-प्रोफाइल क्लबमध्ये खाद्य सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) शहरातील १० प्रमुख क्लबमध्ये तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत काही ठिकाणी मुदत संपलेले मांस आणि मासे, योग्य लेबल नसलेले खाद्यपदार्थ तसेच अस्वच्छ किचन आढळून आले. या गंभीर त्रुटींनंतर किमान दोन आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे.

तपासणीमध्ये बोरिंग क्लब, सेंच्युरी क्लब, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) क्लब आणि महालक्ष्मी लेआउट क्लब यांसारख्या प्रमुख क्लबचा समावेश होता. हाय-प्रोफाइल क्लबमध्ये मोठ्या संख्येने सदस्य आणि ग्राहकांना अन्न दिले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थांची साठवणूक, स्वच्छता आणि हाताळणीच्या नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे.

चिन्नास्वामी स्टेडियम क्लबच्या कॅन्टीनमध्ये तपासणीदरम्यान मुदत संपलेले मासे आढळले. याशिवाय तेथे साठवून ठेवलेल्या तूर डाळीवर ती कधी पॅक किंवा साठवण्यात आली, याची तारीख नमूद करण्यात आलेली नव्हती. किचनमध्ये स्वच्छतेची स्थितीही समाधानकारक नसल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. या प्रकारानंतर संबंधित कॅन्टीनला नोटीस बजावण्यात आली. मुदत संपलेले मांस किंवा मासे वापरल्यास ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कच्च्या खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक आणि त्यांची मुदत नियमित तपासणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

जगभरातील अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्सला स्थगिती

ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींचे सैन्याला लष्करी कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य!

ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ला? माजी सीडीएस काय म्हणाले?

इराणसोबतच्या तेल व्यापाराप्रकरणी चार भारतीय कंपन्यांसह तीन व्यक्तींवर निर्बंध

महालक्ष्मी लेआउट क्लबच्या कॅन्टीनमध्येही किचनच्या स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्या. खाद्यपदार्थ तयार करण्याच्या जागेची आवश्यक स्वच्छता राखली जात नसल्याचे तपासणीत समोर आले. यामुळे संबंधित आस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, बंगळुरूमध्ये खाद्य सुरक्षेबाबतची ही कारवाई केवळ क्लबपुरती मर्यादित नाही. यापूर्वी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि इतर खाद्य आस्थापनांमध्येही मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा