25 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरक्राईमनामाघृणास्पद : गर्भवती सुनेवर सासऱ्याचा बलात्कार, पण पती म्हणाला, आता तू माझी...

घृणास्पद : गर्भवती सुनेवर सासऱ्याचा बलात्कार, पण पती म्हणाला, आता तू माझी अम्मी!

पोलिसांनी सासऱ्याविरोधात ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. २० वर्षांची गर्भवती सून घरात एकटी असताना नराधम सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

 

महिलेचा पती त्याच्या आईला घेऊन डॉक्टरकडे (हकिम) गेला असल्याची संधी साधून नराधम सासऱ्याने हे लज्जास्पद कृत्य केले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा ही बाब तिने पतीला सांगितली, तेव्हा पतीने मुस्लिम धर्मीयांच्या शरियत कायद्याचा हवाला देऊन ती आता आपल्यासोबत राहू शकत नाही, असे सांगत तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यासही नकार दिला. तसेच, ती आता आपल्या वडिलांशी संबंध ठेवल्यामुळे वडिलांची पत्नी आणि त्याची आई झाल्याची धक्कादायक सबब सांगितली. त्यामुळे आता ती त्याच्यासोबत राहू शकत नाही, असेही त्याने तिला सांगत तिला घराबाहेर हाकलून दिले.

 

 

अखेर या पीडित महिलेने स्थानिक पोलिस ठाण्यात सासरा, पती आणि सासूविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी सासऱ्याविरोधात ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात घडली. सिकंदरपूर गावात राहणाऱ्या या २० वर्षीय महिलेचा विवाह १९ ऑगस्ट २०२२ रोजी झाला होता. विवाह झाल्यापासूनच तिच्या सासऱ्याचा तिच्यावर डोळा होता, असा या महिलेचा आरोप आहे.

हे ही वाचा:

लिबियात हाहाःकार, महापुरामुळे २० हजार मृत्यू

ड्रग्स माफिया बेबी पाटणकरने सोने देण्याच्या नावाखाली फसवले

पाकिस्तानचा खेळ संपला; श्रीलंका अंतिम फेरीत

जो बायडेन यांच्या मुलाला ड्रग्जचे व्यसन, बंदूक बाळगण्याचा आरोप

 

५ जुलै रोजी तिचा नवरा त्याच्या आईला घेऊन मीरापूर येथील डॉक्टरकडे गेला असल्याचा गैरफायदा घेऊन सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच, याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची धमकीही दिली. जेव्हा तिचा पती आणि सासू घरी परतली, तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार दोघांनाही सांगितला. मात्र त्यानंतर तिच्या पतीने तिच्याशी आता यापुढे आपले कोणतेही नाते नाही, असे स्पष्ट करत तिला घरातून हाकलून लावले. तसेच, आता त्याच्या वडिलांनी तिच्याशी संबंध ठेवल्याने ती आता वडिलांची पत्नी आणि त्याची आई झाली असून ती आता त्याच्यासोबत राहू शकत नाही, असे त्याने तिला सांगितले.

 

 

यानंतर तिच्या सासूने तिला मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून लावले. ही महिला या घटनेनंतर खूप घाबरली होती. त्यामुळे ती तिच्या वडिलांच्या घरी परतली मात्र तिने कोठेही या प्रकाराची वाच्यता केली नाही. अखेर महिनाभरानंतर तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यनंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा