24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरक्राईमनामापिंपरी-चिंचवडमधील फटाक्याच्या गोदामाला आग, सहा जणांचा मृत्यू!

पिंपरी-चिंचवडमधील फटाक्याच्या गोदामाला आग, सहा जणांचा मृत्यू!

जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल

Google News Follow

Related

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे.या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.

पिंपरी- चिंचवडच्या तळवडे भागात फटाक्यांच्या गोदामाला आग लागली.ही घटना पाच वाजण्याच्या सुमारास घडली.या आगीत सहा ते सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य काही कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.वाढदिवसाला लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता.आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.तसेच सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत.

हे ही वाचा:

खमक्या भूमिकेमुळे जरांगेंची कोंडी

सततच्या रडण्याला कंटाळून मतिमंद व्यक्तीने नातू आणि सुनेची केली हत्या!

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द!

‘वाँटेड’ गुन्हेगारांनी भारतात या आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा!

पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या घटनेची माहिती दिली.ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे. वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, या आगीत मृत्यू झालेल्या सहा जणांची ओळख अजूनही पटलेली नाही. मात्र यात ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमींमध्ये ७ महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या सगळ्या जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारखान्यात जवळपास २० ते २५ कामगार काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारात आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरड सुरु करत या कारखान्यातून बाहेर पडले. मात्र सहा जण याच आगीतून स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरले आणि त्यांचा होरपळून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा