28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारण‘हिंदूंना संपविण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवैसींकडून शपथ घेणार नाही!’

‘हिंदूंना संपविण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवैसींकडून शपथ घेणार नाही!’

तेलंगणाच्या भाजपा आमदाराने दिला इशारा

Google News Follow

Related

तेलंगणाच्या निवडणुकीत भाजपाला अल्प यश मिळविले असले तरी आपल्या विचारांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही, असा पवित्रा तिथल्या भाजपा आमदाराने घेतला आहे. तात्पुरत्या काळासाठी तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आमदारकीची शपथ ग्रहण करणार नाही, असा इशारा भाजपाचे नवनिर्वाचित आमदार टी. राजा सिंग यांनी दिला आहे.

 

अकबरुद्दीन ओवैसी यांची एक दिवसासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे त्यांची निवड राज्यपाल तामिळसाई सुंदरराजन यांनी केली आहे. पण ओवैसी यांनी १५ मिनिटांसाठी सुरक्षा हटवा आपण १०० कोटी हिंदूंना संपवून टाकू या केलेल्या विधानाचा निषेध म्हणून राजा यांनी ही कठोर भूमिका घेतली आहे.

टी. राजासिंग यांनी म्हटले आहे की, आम्ही उद्या (शनिवारी) बहिष्कार घालू. जर अकबरुद्दीन ओवैसी हे अध्यक्षस्थानी असतील तर मी आमदार म्हणून शपथ ग्रहण करणार नाही. राजा सिंग यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने अशी धमकी दिली होती की, जर १५ मिनिटांसाठी पोलिस हटवले तर मुस्लिम हे हिंदूंना संपवतील. जी व्यक्ती गाईचे मांस खाण्यास प्रवृत्त करतो, अशा व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली आम्ही शपथ घेणार नाही. अकबरुद्दीन हे कासिम रिझवीची निष्पत्ती आहे.
कासिम रिझवीने तेलंगणाच्या जनतेचे शिरकाण केले होते. तो निझामाच्या रझाकार लष्कराचा प्रमुख होता.

राजा सिंग यांनी म्हटले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेसने सरकार बनवल्यानंतर आणि रेवंथ रेड्डी मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजपा, एमआयएम आणि बीआरएस हे सगळे पक्ष एकच आहेत. पण तेलंगणाची जनता वास्तव जाणून आहे.

हे ही वाचा:

कुणबीमधून आरक्षण पाहिजे तर मराठा समाज लंगोट घालणार का?,ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल!

काश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती

पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’

फिलिपिन्स, नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने

अकबरुद्दीन यांनी २०१२मध्ये हे भडकावू भाषण केले होते. २०१९मध्येही त्यांनी या वाक्याचा पुनरुच्चार केला होता
राजासिंग म्हणाले की, आम्ही भाजपाचे आमदार अकबरुद्दीनच्या अध्यक्षतेखाली शपथ घेणार नाही. दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात जाऊन मी शपथ घेईन. त्या दिवशी नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे.

 

राजा सिंग यांनी ही भूमिका व्यक्त केली असली तरी भाजपाच्या तिथे निवडून आलेल्या इतर सात आमदारांनी मात्र कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही. संसदीय पक्षाची बैठक होऊन त्यात राजा सिंग यांचे मत हे त्यांच्या वैयक्तिक मत आहे की, पक्षाची भूमिका हे स्पष्ट होणार आहे.त्याआधी, शुक्रवारी राज्यपाल सुंदरराजन यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांची हंगामी नियुक्ती केली. शनिवारपुरते अकबरुद्दीन हे अध्यक्ष राहणार आहेत. त्यानंतर आमदार हे नव्या अध्यक्षाची निवड करणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा