28.2 C
Mumbai
Monday, July 27, 2026
घरक्राईमनामाभायखळा पोलीस ठाण्यात शॉर्ट सर्किटमुळे आग; जीवितहानी टळली

भायखळा पोलीस ठाण्यात शॉर्ट सर्किटमुळे आग; जीवितहानी टळली

महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याचा संशय

Google News Follow

Related

भायखळा पूर्व येथील हंसराज मार्गावर असलेल्या भायखळा पोलीस ठाण्याच्या जी प्लस वन (तळमजला अधिक एक मजला) इमारतीला रविवारी रात्री अचानक आग लागली. मुंबई अग्निशामक दलाच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे ही आग अवघ्या काही वेळात आटोक्यात आणण्यात यश आले असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गुन्ह्यातील महत्वाचे कागदपत्रे जळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान माहीम पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक १८ ला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण ८ वाजून २० मिनिटांनी आगीची ही माहिती अग्निशामक दलाला मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि ८ वाजून २८ मिनिटांनी ही आग ‘लेवल १’ असल्याचे घोषित केले. अथक प्रयत्नांनंतर रात्री साधारण ९ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नसली तरी पोलीस ठाण्यात असलेल्या कागदपत्रे आणि महत्वाच्या गुन्ह्यातील केसपेपर जळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

तांदळातील खडे काढण्याचे काम

‘कोक्रॉच’ आंदोलनानंतर झाला ६० मेट्रिक टन कचरा

मालीत भारतीय हिरे व्यापाऱ्याचे अपहरण; ४४ कोटींची ‘डील’

मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार!

“भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीत आगीची दुर्घटना घडली होती, मात्र अग्निशामक दलाने ती वेळीच आटोक्यात आणली. प्राथमिक दृष्ट्या शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण समोर आले असून, पुढील आवश्यक कारवाई सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.” – जयंत मीणा, पोलीस उपायुक्त (DCP)

सध्या घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन (अग्निशमन व शीतकरण प्रक्रिया) सुरू असून पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. समयसूचकता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
323,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा