29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामायोगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये लखनऊ पोलिसांची पहिली चकमक

योगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये लखनऊ पोलिसांची पहिली चकमक

Google News Follow

Related

योगी सरकारने २.० मध्ये झिरो टॉलरन्सच्या संदर्भात, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र केली आहे.

या झिरो टॉलरन्स गुन्हेगारी धोरणाचा युपीमध्ये शनिवारी रात्री पुन्हा एकदा गुन्हेगारांवर चांगलाच परिणाम झाला. पॉलिटेक्निक चौकात गुंड आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. चकमकीदरम्यान गुंड नसीम उर्फ ​​फिरोज उर्फ ​​नदीम हा गोळी लागल्याने जखमी झाला आहे. पोलिसांनी नसीम आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

युपी पोलिस शनिवारी रात्री उशिरापर्यंत पॉलिटेक्निक चौकात तपासणी करत होते. दरम्यान, तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या गुंडानी गाडी थांबवण्याऐवजी गाडीचा वेग वाढवला. यानंतर ते उड्डाणपुलाखाली गेले आणि त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी घेराव घालून प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी प्रत्युत्तर देत असताना केलेल्या गोळीबारात एका गुंडाच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्याचवेळी पळून जाणाऱ्या दुसऱ्या गुंडालाही पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. गोळी लागून नसीम हा जखमी झाला आहे तर आसिफला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गाझीपूर परिसरात शस्त्राच्या जोरावर व्यापाऱ्याकडून २५ हजार रुपये लुटल्याचे समोर आले आहे. गाझीपूरचे एसीपी सुनील कुमार यांनी सांगितले की, हे दोन्ही गुंड ​​नसीम आणि असिफ हे गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या दोघांविरुद्ध चोरी आणि स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी गोंडा, लखनौसह अनेक जिल्ह्यांमध्ये चोरीचे गुन्हे केले आहेत.

हे ही वाचा:

एक एक रुपया जमा करून त्याने घेतली ड्रीम बाईक

नुकतेच लग्न झालेल्या कबड्डीपटूचा खून

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार

रझिया सुलतानाची आई का रडतेय?

दरम्यान, पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी पोलीस चकमकीत सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा