29.3 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरक्राईमनामारिंकु शर्मा हत्येत सामील असलेल्या चौकडीला अटक, इतरांचा तपास सुरू

रिंकु शर्मा हत्येत सामील असलेल्या चौकडीला अटक, इतरांचा तपास सुरू

Google News Follow

Related

रिंकु शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृण खुनाच्या खटल्यात आणखी चौघांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिंकु शर्मा याची मंगोलपुरी येथे त्याच्या निवासस्थानीच चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती.

हे ही वाचा:

रामनिधी संकलन करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; आरोपींना अटक

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार साक्षिदार तसेच सीसीटीव्ही फुटेज यांच्या सहाय्याने पोलिसांनी आणखी चौघांना या प्रकरणात अटक केली आहे. दीन मोहंमद, दिलशान, फैयाझ आणि फैझान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व स्थानिक रहिवासी आहेत. पोलिसांनी या पूर्वीच या खटल्याच्या संदर्भात पाच जणांना अटक केली होती. नव्या अटकेमुळे या खटल्यात एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज नुसार काठ्या आणि इतर हत्यारं वापरून रिंकुवर हल्ला करणारे हल्लेखोर म्हणून या चौघांची ओळक पटत आहे.

दिल्लीतील मंगोलपुरी विभागाचा रहिवासी असणाऱ्या रिंकु शर्मा याची १० फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. ही राम मंदिर निर्माण निधीच्या संकलनाच्य संदर्भात उद्भवलेल्या एका वादातून रिंकु शर्माची हत्या केली गेली होती. रिंकु शर्मा हा बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. त्याच्या राहत्या घरातच प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर रिंकुला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र दुर्देवाने त्याचा अंत झाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा