34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामामलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

Google News Follow

Related

होळी पौर्णिमेच्या दिवशी कल्याण जवळील मलंगगड येथे चालू असलेली आरती काही मुसलमान युवकांनी गोंधळ घालून थांबवली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आरतीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी याबाबत पोलीसांकडे गुन्हा देखील दाखल केला होता. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाने याबाबत जर पोलीसांनी कडक कारवई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर पोलीसांनी चार मुस्लिम तरूणांना अटक केली. त्याबरोबरच त्यांच्यावर दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्याच्या कलमासोबत ३५३ कलम देखील लावले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत पराग तेली, विश्व हिंदु परिषद, कल्याण जिल्हा यांच्याशी सविस्तर बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली अनेक वर्षे मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी दर पौर्णिमेला नेमाने आरती केली जाते. मात्र जेव्हा मुसलमानांनी हे मुस्लिम धार्मिक स्थळ आहे असा दावा करायला सुरूवात केली, त्यानंतर या बाबत ठाणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात दावा चालू आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, पाल्हाळिक बोलणे बंद करा

रुग्णांना मरायला सोडलंय का?- गिरीश महाजन

संजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाली होती पवार-राऊत भेट

यापूर्वी कधीही आरती थांबवण्यासारखी अप्रिय घटना घडली नव्हती. दर पौर्णिमेला विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते जाऊन आरती करतात, परंतु यावर्षी कोविडचे निर्बंध पाळून केवळ १७ कार्यकर्ते गेले होते. पोलीसांनी सोशल डिस्टसिंग पाळून फक्त ७ कार्यकर्त्यांना जाऊ दिले होते आणि बाकीचे बाहेर प्रांगणात उभे होते. या सात कार्यकर्त्यांना धार्मिक विधींसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आरती करायला सुरूवात करण्यात आली. आरती संपत आली असताना शेजारच्या मस्जिदीत साधारण शंभर सवाशे युवक होते. त्यातले ३०-४० जण आत शिरले आणि त्यांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा द्यायला सूरूवात केली आणि धक्काबुक्की करायला सुरूवात केली.

यावेळी तिथे उभ्या असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण सामोपचाराने मिटवायचा प्रयत्न केला. परंतु त्या मुसलमान युवकांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. त्यानंतर अधिक तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना निघून जाण्याची विनंती पोलीस प्रशासमनाकडून करण्यात आली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच काही कार्यकर्ते आपल्या परिवारासह आले होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उद्भवू नये यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते खाली आले.

खाली आल्यावर परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु तरीही आम्ही तिथे अर्ज दिला आणि त्यात सात-आठ जणांची नावे दिली होती आणि त्याशिवाय पन्नास साठ जणं होती असे पत्र पोलिसांकडे देण्यात आले.

या घटनेनंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जर पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी दंगलीची कलमे लावली, कलम ३५३ दाखल केले आणि त्यासोबत ४ लोकांना अटक केली आणि इतरांचा शोध चालू आहे.

मुस्लिमांनी एका मस्जिदमध्ये जमून या प्रकाराबाबते षडयंत्र रचले. हिंदूंच्या धार्मिक भावनांना मुद्दाम दुखावण्याचा त्याबरोबरच सामाजिक शांतता बिघडवण्याचा कट त्यांनी केला आणि त्यानुसार हा प्रकार घडवण्यात आला, असा आरोप तेली त्यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कलम २९५ आणि १२० ब ही कलमे लावली जावीत अशी मागणी देखील त्यांनी पोलीसांकडे केली आहे.

मलंगगडावरील धार्मिक स्थळ हे हिंदु देवस्थान आहे असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मच्छिंद्रनाथांचे मुस्लिम भक्तही असू शकतात, त्याबद्दल आम्हाला काहीच म्हणणे नाही असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच अयोध्येच्या धर्तीवर मच्छिंद्रनाथांच्या मंदीराला देखील न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यापुर्वी पालखीच्या वेळीदेखील धक्काबुक्की वगैरे केली होती. परंतु आतमध्ये आरती थांबवण्याचा हा प्रकार प्रथमच घडला असेही पराग तेली यांनी सांगितले. या प्रकारासाठी मुस्लिम समाजाची अराजकतेची मनोवृत्तीच कारणीभूत असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. त्याबरोबरच त्यावेळी आम्ही संख्येत कमी होतो, शिवाय त्यांचा नेमका काय हेतू होता हे स्पष्ट नव्हते म्हणून आम्ही संयम बाळगला. जर तो बाळगला नसता तर काय घटना घडली असती ते सांगता येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अशी घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने याबाबत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा