29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामानिर्दोष मुक्ततेनंतर सात वर्षांनी अश्विन नाईक येणार तुरुंगातून बाहेर

निर्दोष मुक्ततेनंतर सात वर्षांनी अश्विन नाईक येणार तुरुंगातून बाहेर

Google News Follow

Related

दादर येथील खंडणीच्या गुन्हयात अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगार अश्विन नाईक आणि साथीदाराची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सात वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर अश्विन नाईक बुधवारी तुरुंगातून बाहेर पडला.

अश्विन नाईक आणि त्याचे साथीदार प्रमोद केळुस्कर, प्रथमेश परब, जनार्दन सकपाळ, राजेश तांबे, अविनाश खेडेकर, मिलिंद परब आणि सुरज पाल यांना २०१५ मध्ये दादर पोलिसानी खंडणी,अपहरण या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

या सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती.
दादर मधील एका बांधकाम व्यवसायिकाकडे डिसेंबर २०१५ मध्ये अश्विन नाईक याने ५० लाख रुपयांची खंडणी आणि ६ हजार स्केवर फूटाच्या फ्लॅटची मागणी करून व्यवसायिकाचे अपहरण केले होते.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अश्विन नाईक आणि त्याचे इतर सहकारी यांना तळोजा आणि ठाणे कारागृह येथे पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा खटला मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयात सुरू होता. मंगळवारी न्यायालयाने अश्विन नाईक आणि त्याचे इतर साथीदार यांना या गुन्हयातून निर्दोष मुक्तता केली आहे. बुधवारी अश्विन नाईक आणि त्याच्या इतर साथीदाराची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

अश्विन नाईक हा अरुण गवळीचा प्रतिस्पर्धी आहे. अरुण गवळी टोळीचा शार्प शूटर रवींद्र सावंत याने आश्विन नाईक याच्यावर न्यायालयाच्या आवारात गोळी झाडली होती. ही गोळी आश्विनच्या डोक्यातून आरपार जाऊन देखील अश्विन नाईक त्यातून बचावला होता. या हल्ल्यानंतर गवळी टोळी आणि नाईक टोळीत गँगवार सुरू झाले होते.

हे ही वाचा:

धूळ खात पडला आहे, अग्निशमन दलाचा ‘पांढरा हत्ती’

६७ टक्के पालक म्हणताहेत मुलांना शाळेत पाठवू

पंजाबनंतर हरियाणामध्ये काँग्रेसवर संकट

भारताच्या ‘वॅक्सिन’ मुत्सद्देगिरीला यश

दरम्यान अश्विन नाईक याचा भाऊ अमर नाईक हा पोलीस चकमकीत पोलीस अधिकारी यांच्या विजय साळसकर यांच्या गोळीत मारला गेला होता. १९९९ ला अश्विन नाईकला अटक करण्यात आल्यानंतर दहा वर्षांनी तो तुरुंगातून बाहेर पडला होता, या दरम्यान त्याची पत्नी आणि शिवसेनेच्या नगरसेविक नीता नाईक यांची चिंचपोकळी येथे हत्या करण्यात आली होती. ही हत्या अश्विन नाईक याने घडवून आणल्याचा संशय त्याच्यावर होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा