31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाकाय चाललंय पुण्यात? बँक लुटीनंतर आता गँगवॉर

काय चाललंय पुण्यात? बँक लुटीनंतर आता गँगवॉर

Google News Follow

Related

पुण्यातील उरळीकांचनमध्ये गँगवारमधून दिवसाढवळ्या गोळीबार झालेला आहे. या गोळीबारामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. गोळीबाराच्या घटनेमध्ये एकजण गंभीर जखमी असल्याचे समजते. भर दिवसा रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे आजूबाजूच्या भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून लोणीकाळभोर परिसरातील उरळी कांचन येथील तळवेडे चौकात ही गोळीबाराची घटना घडली. तसेच या गोळीबारामध्ये संतोष जगताप याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हॉटेल सोनईसमोर ही घटना घडली.

वाळू व्यावसायिक असलेला संतोष जगताप यामध्ये मरण पावला. संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर चर्चा करत होते. यावेळीच पाच जणांनी मिळून संतोष जगताप यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी यावेळी तीक्ष्ण हत्यारासह जगताप यांच्यावर गोळीबारही केला. यावेळी जखमी जगताप यांनीही प्रत्युत्तर देत हल्लेखोरांवर गोळीबार केला.

या घटनेमध्ये जगताप यांचे अंगरक्षकही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी केलेल्या गोळीबारात, एक हल्लेखोर ठार झाला. उरलेले हल्लेखोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर जगताप यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकांना लोणी काळभोर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच संतोष जगताप यांचा मृत्यू झाला. बाकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.

 

हे ही वाचा:

आर्यन खान-अनन्या पांडे काय बोलले चॅटमध्ये?

चीनशी सामना करायला आता ‘पिनाका’ तैनात

…म्हणून योगेंद्र यादवना शेतकरी आंदोलनातून हाकलले!

अखिलेश यादव आणि तुकडे तुकडे गॅंगची हातमिळवणी

 

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरूद्ध असलेल्या एका टोळीमध्ये हे फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युद्ध भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा