31 C
Mumbai
Friday, May 26, 2023
घरक्राईमनामात्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली! 

त्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली! 

पुण्यातून आरोपीला केले जेरबंद

Google News Follow

Related

एमपीएससीच्या हॉल तिकीटाचा डाटा हॅक करणारा पुण्यातून जेरबंद 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेले पूर्व परीक्षेची तब्बल ९४ हजार १९५ हॉल तिकिटे बेकायदा डाऊनलोड करून ती टेलिग्राम चॅनलवर प्रसारित करणाऱ्या रोहित कांबळे (१९) या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली.

या प्रकरणातील आरोपी रोहित हा डार्कनेटवरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे आढळून आले असून त्यांच्याकडून त्याला एमपीएससीच्या वेबसाइटवरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल ४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र २८एप्रिल रोजी आपल्या वेबसाइटवर टाकले होते. हे हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बाह्य लिंकद्वारे आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आले होते. मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत हॅकरने आयोगाने वेबसाइटवर टाकलेल्या बाह्य लिंकमध्ये बेकायदा घुसून त्यातील माहिती अवैधरीत्या प्राप्त करुन त्याद्वारे वेबसाइटवरील तब्बल ९४ हजार १९५ परीक्षार्थींचे हॉल तिकीट डाऊनलोड केले होते.

त्यानंतर हॅकरने आयोगाच्या वेबसाइटवरून डाऊनलोड केलेला परीक्षार्थींच्या हॉल तिकिटाचा डाटा एमपीएससी २०२३ ए या टेलिग्रामच्या चॅनलवर बेकायदा प्रसारित केला होता. या प्रकारानंतर एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.

तपासात सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या टीमने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करून हॅकरने गुन्हा करताना वापरलेला आयपी ऍड्रेस मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटील नगर येथून बुधवारी ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

‘१ जूनपासून वीजबिल भरू नका’ : कर्नाटकच्या भाजप खासदाराचे आवाहन

असा असेल संसद भवन उदघाटन कार्यक्रम; पूजा, सेंगोल प्रतिष्ठापना, पंतप्रधानांचे संबोधन

इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?

कर्नाटक काँग्रेस सरकार हिजाबवरील बंदी मागे घेण्याच्या विचारात

यावेळी पोलिसांनी रोहित कांबळे याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेले एक डेस्कटॉप, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन व एक इंटरनेट राऊटर जप्त केले आहे. रोहित याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती भारंबे यांनी दिली. न्यायालयाने त्याला २७ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठवल्याचेही त्यांनी सांगितले.

रोहित हा बीएससीच्या दुसऱया वर्षात शिकत असून त्याने सायबर सिक्युरिटीचे विविध कोर्स केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच, तो डार्क नेटवरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले असून डार्कनेट वरील हॅकर्सनी त्याला एमपीएसीच्या वेबसाईट वरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेचे प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल ४०० डॉलरची सुपारी दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,852चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
74,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा