34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामातो शिकवत होता, फक्त १५ मिनिटांत एटीएम फोडण्याचं तंत्र...

तो शिकवत होता, फक्त १५ मिनिटांत एटीएम फोडण्याचं तंत्र…

उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये एटीएम चोरीच्या काही घटना घडल्या होत्या. त्या संदर्भात काही संशयितांना अटक करण्यात आली होती.

Google News Follow

Related

‘फक्त १५ मिनिटांत एटीएम फोडण्याचं तंत्र शिका’… हा कोणताही व्हॉट्सऍप फॉरवर्ड विनोद नाही तर, बिहारच्या छापरामधील एका ‘एटीएम बाबा’ने केलेली ही जाहिरात आहे आणि मुख्य म्हणजे काही तरुणांनी या जाहिरातीला भुलून त्याच्याकडे चोरीचे धडेही गिरवले आहेत.

बिहारच्या या माणसाने उत्तर प्रदेशमधील काही चोरांना एटीएम कसे फोडायचे, याचे प्रशिक्षण तर दिलेच शिवाय लखनऊमध्ये एका लुटीचा कटही आखून तो तडीसही नेला. ‘एटीएम बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अट्टल चोराचे नाव आहे सुधीर मिश्रा. उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये एटीएम चोरीच्या काही घटना घडल्या होत्या. त्या संदर्भात काही संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या ‘एटीएम बाबा’चा प्रताप उघडकीस आला आहे.

या संशयितंनी एसबीआयचे एटीएम फोडून अवघ्या १६ मिनिटांत तब्बल ३९ लाख ६८ हजारांची रक्कम चोरून पोबारा केला होता. तपासादरम्यान हा संपूर्ण चोरीचा कट मिश्रा, त्याचा मित्र बुलबुल मिश्रा आणि इतर सहकाऱ्यांनी आखल्याचे उघडकीस आले.

हे ही वाचा:

एकलव्य खाडेचे वेगवान शतक; एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी विजयी

भारतीय सैन्याच्या सेवेत एक बकरा तोही हवालदार?

आतिक अहमदच्या कार्यालयात आढळलेले रक्ताचे डाग माणसाचेच!

भारतीय सैन्याच्या सेवेत एक बकरा तोही हवालदार?

.. असा आखला कट

३ एप्रिल रोजी चार चोरांनी लखनऊतील सुलतानपूर रस्ता भागातील एका एटीएममधून चोरी केली. या संपूर्ण लुटीची जबाबदारी सुधीर मिश्राचा जवळचा सहकारी नीरज मिश्रा याच्यावर होती. त्याने अन्य तिघांच्या मदतीने ही लूट केली, अशी माहिती सहपोलिस आयुक्त नीलाब्जा चौधरी यांनी दिली.

ही लूट करण्यापूर्वी देवाश पांडे आणि विजय पांडे याने परिसराची रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी हरयाणातील मेवात भागातून चार चोरांना बोलावले आणि ही लूट करण्या आली. ही लूट होत असताना ‘एटीएम बाबा’ हा बिहारमध्ये होता आणि तो मोबाइल फोनवरून अन्य संशयित आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. त्यांनी एटीएम मशीन फोडण्याची तयारी आधीच केली होती. त्यासाठी त्यांनी तीन गॅसपाइप, एक सिलिंडर रेग्युलेटर, एक गॅस मीटर, सहा हॅकसॉ ब्लेड, एक मोठी पहार, दोन पक्कड आणि एक हातोडा घेऊनच ते एटीएमवर आले होते.

या सर्व संशयितांना ‘एटीएम बाबा’ म्हणजेच सुधीर मिश्राने हा कट तडीस नेण्याचे प्रशिक्षण दिले होते. या सर्वांनी आपली चोरी पकडली जाऊ नये, यासाठी एटीएमवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळी शाईही लावली होती. तर, चोरी होत असताना दोघेजण एटीएमबाहेर नजर ठेवून होते. अवघ्या १५ ते १६ मिनिटांत या चोरांनी एटीएम फोडून त्यातील पैसे घेऊन पोबारा केला.   मात्र पहाटे तीनच्या सुमारास नीरज मिश्रा, राज तिवारी, पंकज कुमार पांडे उर्फ लिटर आणि कुमार भास्कर ओझा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी लखनऊ पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा