27 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरविशेषएकलव्य खाडेचे वेगवान शतक; एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी विजयी

एकलव्य खाडेचे वेगवान शतक; एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी विजयी

पहिली राजसिंग डुंगरपूर चषक या १५ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट

Google News Follow

Related

सी.सी.आय. आयोजित पहिल्या राजसिंग डुंगरपूर चषक या १५ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या शतकाची नोंद झाली. एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या सलामीवीर एकलव्य खाडे याने केवळ ५३ चेंडूत १९ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने १२३ धावांची धुवांधार खेळी करून आजचा दिवस गाजवला. त्याच्या या शतकी खेळीमुळे एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमीने अविनाश साळवी फौंडेशन विरुद्ध तब्बल १८३ धावांनी मोठा विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी करताना त्यांनी निर्धारित २० षटकांत ४ बाद २३५ धावांचा डोंगर उभारला. एकलव्य खाडे (१२३) आणि प्रचित आमकर (४७) यांनी १३.५ षटकांतच १६७ धावांची झंझावाती भागीदारी रचली. नंतर सहाव्या क्रमांकावरील रेहान मुलानीने ९ चेंडूत नाबाद २४ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना शॉन कोरगावकरच्या ९ धावांत ४ बळी) फिरकी समोर अविनाश साळवी फौंडेशन संघाला २० षटकांत ८ बाद ५२ धावांचीच मजल मारता आली. सामनावीर म्हणून शतकवीर एकलव्य खाडेंचीच निवड करण्यात आली.

“बी” गटात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. संजीवनी क्रिकेट अकादमी संघाने २० षटकांत २ बाद १७९ धावांचे लक्ष्य उभारले त्यात युवराज माळी (५७) आणि अथर्व धोंड (५६) यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या हर्षवर्धन बारमुख (नाबाद २६) आणि सौरिश देशपांडे (नाबाद ३०) यांनीही मोलाची भर टाकली. या आव्हानाचा पाठलाग करताना अवर्स क्रिकेट अकादमी संघाने १४ धावांत २ बळी गमावले होते. मात्र एल्टन सोरेस (नाबाद ७२) आणि वेदांत पाटील (४०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागी रचून संघाला सावरले. मात्र वाढत्या धावगतीसमोर आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीने त्यांना निरुत्तर केले आणि त्यांचा डाव ३ बाद १३९ वर सीमित राहिला.

दरम्यान ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आयुष ठाकूर (४४) आणि विधिराज शुक्ला (२४) यांच्या सुंदर फलंदाजीमुळे ७ बाद १२३ धावांचे लक्ष्य उभारले आणि प्रतिस्पर्धी सी.सी.आय. किड्स अकादमी संघाला ६३ धावांत गुंडाळत ६० धावांनी मोठा विजय मिळविला. त्यामुळे “बी” गटात संजीवनी, अवर्स अकादमी आणि ड्रीम ११ वेंगसरकर अकादमी या तीन संघांचे प्रत्येकी चार-चार गुण असून सरस कोशंटवर गटविजेता ठरेल.

हे ही वाचा:

राजन साळवींच्या बारसू रिफायनरीच्या पाठिंब्यामुळे ठाकरे गटाची गोची

भारतीय सैन्याच्या सेवेत एक बकरा तोही हवालदार?

दंतेवाड्यात नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ११ जवान शहीद

चालकाची बळजबरी, बेंगळुरूत महिलेने रॅपिडो बाईकवरून मारली उडी !

संक्षिप्त धावफलक – एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २० षटकांत ४ बाद २३५ (एकलव्य खाडे १२३, प्रचित आमकर ४७, रेहान मुलानी नाबाद २४; आर्यन काळे ५३/२) वि.वि. अविनाश साळवी फौंडेशन – २० षटकांत ८ बाद ५२ (व्योमेश घोटकर नाबाद १५, ; शॉन कोरगावकर ९/४).

संजीवनी क्रिकेट अकादमी – २० षटकांत २ बाद १७९ (युवराज माळी ५७, अथर्व धोंड ५६, हर्षवर्धन बारमुख नाबाद २६, सौरिश देशपांडे नाबाद ३०) वि. वि अवर्स क्रिकेट अकादमी – २० षटकांत ३ बाद १३९ (एल्टन सोरेस नाबाद ७२, वेदांत पाटील ४०).

ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २० षटकांत ७ बाद १२३ (आयुष ठाकूर ४४, विधिराज शुक्ल २४, निरंजन पाटील १५, ओम दावत नाबाद २१; अमन सिंग २०/२, सुमेर सिंग १८/२) वि.वि. सी.सी.आय. किड्स अकादमी – २० षटकांत सर्वबाद ६३ (सुमेर सिंग १३, वरून मीनबाटलीवाला १३; गजानन नारपगोल १/२, निरंजन पाटील १०/२, शौनक वाडेगावकर ९/२).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
111,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा