29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणराजन साळवींच्या बारसू रिफायनरीच्या पाठिंब्यामुळे ठाकरे गटाची गोची

राजन साळवींच्या बारसू रिफायनरीच्या पाठिंब्यामुळे ठाकरे गटाची गोची

ठाकरे गटातच मतभेद तर शरद पवारांचा राज्य सरकारला चर्चेचा सल्ला

Google News Follow

Related

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देऊन देखील उद्धव ठाकरे गटाकडून विरोध कायम आहे. हा प्रकल्प होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधानांना पत्र लिहून बारसूची जागा योग्य असल्याचे सांगितल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. तरीही आता या प्रकल्पावर टीका करण्यात येत आहे. पण शिवसेना गटाचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी मात्र या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. स्थानिकांच्या रोजगाराच्या मुद्यावरून आपण पाठिंबा देत असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे. त्यामुळे या रिफायनरीच्या मुद्यांवरून ठाकरे गटातील पदाधिका-यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गट स्थानिकांच्या बाजूने पण आमदारांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिका यावरून ठाकरे गटातच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे प्रकल्प सुरू करताना सरकारने स्थानिकांशी चर्चा करावी असा सल्ला दिल्याने या विरोधातील हवा गेल्याचे दिसून येत आहे.

“कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच….माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये,” असे ट्विट करत राजापुरातील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.रिफायनरीबाबत प्रशासनानं बाजू समजावून सांगावी असे देखील आमदार साळवी यांनी म्हटले आहे.

कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोकणातील बहुंताश तरुण वर्ग नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाला आहे, परंतु हा प्रकल्प कोकणात आल्यास नोकरीच्या शोधात तरुणांना शहराकडे येण्याची गरज नसल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कोकणातील प्रकल्पाला समर्थन आहे, असे सांगत साळवी यांनी बरसू प्रकल्पासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्योगमंत्री उद्या सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाट्यपरिषदेच्या विषयासंदर्भात भेट घेतली. यावेळी मंत्री सामंत यांनी पवार यांना बारसू रिफायनरी संदर्भात माहिती दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार म्हणाले, बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांविरोधात पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे, अशी आमची तक्रार होती. त्याबाबत आज उदय सामंत यांनी माहिती दिली. अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं ते म्हणाले. तसेच बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित असून सध्या येथील मातीचे परीक्षण केल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावर मी त्यांना हे काम सध्या हे थांबवून विरोधक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी उद्या बारसूमध्ये यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा:

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाला पळवले, सात जण अटकेत

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

एखादा महत्त्वाचा प्रकल्प कोकणात होत असेल आणि त्याला स्थानिकांचा विरोध असेल तर सरकारने स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भू्मिका आहे. अशा विरोधाची नोंद राज्य सरकारने घ्यायलाच हवी, सरकारने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा सल्लाही पवार यांनी राज्य सरकारला दिला.

ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा नाही

आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीला दिलेल्या समर्थनाचा पार्श्वभूमीवर आपले मत मांडतांना पवार म्हणाले, आमची ठाकरे गटाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. उद्या यासंदर्भात बारसू येथे बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला तर आनंदच आहे. मात्र, यावर तोडगा नाही निघाला, तर यावर चर्चा करता येईल असे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा