33 C
Mumbai
Thursday, November 24, 2022
घरक्राईमनामातुम्ही सायबर समस्यांमुळे पीडित आहात, मग इथे संपर्क करा!

तुम्ही सायबर समस्यांमुळे पीडित आहात, मग इथे संपर्क करा!

सायबर सेवेची नवी वेलनेस हेल्पलाइन सुरू

Google News Follow

Related

सायबर विश्वात विविध प्रकारे सायबर हल्ले करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत खूपच वाढले आहे. एकीकडे सायबर जगतातील असुरक्षिततेतून मॉर्फिंग, हॅकींग, ऑनलाईन पाठलाग, आर्थिक फसवणूक यासारखे ऑनलाईन गुन्हे वाढत आहेत तर दुसरीकडे सोशल मिडियाचा अतिरेकी वापर, सायबर विकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या वर्तणूकविषयक तसेच मानसिक समस्या प्रचंड वाढल्या आहेत. सायबर हल्ल्यांना बळी पडणाऱ्यांची आणि ऑनलाईनच्या चक्रव्यूहात अडकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन मार्गाने आलेल्या संकटाचा सामना कसा करावा, कुठे मदत मागावी, यातून बाहेर कसे पडावे याची निश्चित माहिती नसल्याने आधीच गोंधळलेली व्यक्ती आणखीन घाबरून जाते. मात्र आता यासंदर्भात योग्य मार्ग दाखवणारी आणि अशावेळी त्वरित काय पाऊले उचलावीत याविषयी माहिती देणारी ७३५३१०७३५३ ही सायबर वेलनेस हेल्पलाईन सुरु झाली आहे.

‘सायबर सुरक्षा’ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आत्तापर्यंत लाखो मुलांना व महिलांना सायबर सुरक्षा विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या ‘रिस्पोन्सीबल नेटीझम’ या संस्थेतर्फे ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून याचे लोकार्पण नुकतेच महिला आणि बालविकास व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. ७३५३१०७३५३ क्रमांक असलेल्या या सायबर वेलनेस हेल्पलाईनवर सायबर गुन्ह्यांची तक्रार कुठे करावी याची माहिती, कायदेशीर माहिती, सहकार्य आणि पाठींबा व समुपदेशन अशी विविध प्रकारची मदत मिळणार आहे.

हे ही वाचा : 

‘त्या’ ट्विटमुळे रिचा चढ्ढावर नेटकरी संपातले

विक्रम गोखले यांच्या मृत्यूचे खोटे वृत्त व्हायरल

‘काँग्रेस म्हणजे घराणेशाही’

दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?

सायबर गुन्ह्यांचे समाजावर होणारे गंभीर परीणाम लक्षात घेऊन अशावेळी काहीतरी मदत गरजूंना पटकन मिळावी आणि त्यांना पुढील मार्ग सापडावा या उद्देशाने ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून मदत, मार्गदर्शन आणि समुपदेशन या तीन स्तरांवर या हेल्पलाईनचे काम चालणार आहे असे ‘रिस्पॉन्सिबल नेटीझम’च्या संस्थापिका सोनाली पाटणकर यांनी सांगितले. सायबर गुन्ह्याच्या पीडितांना मानसिक आधाराची गरज असते विशेषता सेक्सटोरशन,लोन ऍप द्वारे फसवणूक झालेले. याच बरोबर मुलांमध्ये अतिरिक्त मोबाइल वापरामुळे विविध प्रकारचे आजार बळावताना दिसत आहेत याबद्दलची मदत, समुपदेशन या सायबर वेलनेस हेल्पलाइनवर मिळणार आहे. ही हेल्पलाइन सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यन्त उपलब्ध असेल. हा क्रमांक व्हॉटसऍप क्रमांक देखील आहे त्यामुळे आणीबाणीच्या वेळी मेसेजवर करू शकता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,953चाहतेआवड दर्शवा
1,978अनुयायीअनुकरण करा
52,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा