29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामादिल्लीत हिंदू तरुणाच्या हत्येने तणाव

दिल्लीत हिंदू तरुणाच्या हत्येने तणाव

दिल्लीतील नंद नगरी भागातील डीएम कार्यालयाजवळ मनीष नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यावेळी हिंदी मुस्लिम गट आमने सामने आले होते.

Google News Follow

Related

दिल्लीमध्ये शनिवार, १ ऑक्टोबर रोजी एका हिंदू तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी तीन मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली आहे. हिंदू तरुणाच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तरुणाच्या हत्येनंतर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले होते.

काल रात्री दिल्लीतील नंद नगरी भागातील डीएम कार्यालयाजवळ मनीष नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यावेळी हिंदी मुस्लिम गट आमने सामने आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. नंतर दोन्ही समाजातील लोकांना परत पाठवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलाच्या तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. या खून प्रकरणात पोलिसांनी आलम, बिलाल आणि फैजान या तीन मुलांना रात्री उशिराच ताब्यात घेतले. जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलीसांनी माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

नवरात्री २०२२ : हिंगलाज माता पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?

फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी

… आणि काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला पूल असा झाला इतिहासजमा

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी परस्पर वैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून पोलीस अधिक माहिती घेत आहेत. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदू तरुणाच्या हत्येनंतर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा