25 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरक्राईमनामालव्ह जिहाद करणाऱ्याला उत्तर प्रदेशात केले 'उद्ध्वस्त'

लव्ह जिहाद करणाऱ्याला उत्तर प्रदेशात केले ‘उद्ध्वस्त’

उत्तर प्रदेश सरकारचे मोठे पाऊल 

Google News Follow

Related

‘लव जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी काल हिंदू समाज मुंबईत एकवटला होता . मुंबई आणि राज्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने हिंदू समाजातील बांधव आणि अनेक हिंदू संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करून तिचे लग्न लावून देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या या कृत्यासाठी खूप मोठी शिक्षा भोगावी लागली आहे. याबद्दल उत्तरप्रदेश सरकार योगी आदित्यनाथ यांचे कौतुक होत आहे.

बांदा येथे एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर  करणाऱ्या आरोपीच्या घरावर  सोमवारी बुलडोझर फिरवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला बळजबरी करून इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडणाऱ्या प्रकरणात तिंदवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी अजमेर उर्फ ​​गोलू याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तर धर्मांतर करून आरोपीला आपल्या घरात आश्रय देणाऱ्या शब्बीरचे देखील घर देखील पोलिसांनी सोमवारी तोडले आहे.

२०२२च्या अखेरपर्यंत देशभरात जवळपास १५३ अशा घटना घडल्या ज्यात लव्ह जिहादचा थेट संबंध होता. गेल्या वर्षी झालेली आफताब आणि श्रद्धा वालकर यांच्या प्रेमप्रकरणाची घटनाही त्यातच मोडणारी असून त्यात आफताबने श्रद्धा वालकरकडून सातत्याने होणाऱ्या लग्नाच्या मागणीनंतर कंटाळून तिची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.

बेकायदा बांधकाम पाडले

पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले की, धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर मुलीला एका घरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच या प्रकरणात मौलवीची भूमिका बजावणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्या शब्बीरच्या घरातील बेकायदा बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक

शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी

पवारांच्या भाकितांचे रहस्य काय?

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

इंडिया टुडे सीव्होटर मूड ऑफ द नेशन  सर्वेक्षण

नुकताच इंडिया टुडे सीव्होटर मूड ऑफ द नेशन या अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून अनेक राजकीय गोष्टींबद्दल अंदाज व्यक्त करण्यात आले आहेतच ,पण लव्ह जिहादबाबतही मत नोंदविण्यात आली आहेत. त्यात १ लाख ४० हजार ९१७ लोकांची मते जाणून घेण्यात आली.होती. अतिरिक्त १ लाख ५ हजार लोकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यात मुस्लिम पुरुष हे लव्ह जिहादमध्ये सामील आहेत, असे ५३ टक्के लोकांचे मत आहे.

एकूण मतदारांमधून ५३ टक्के लोकांना असे वाटते आहे की, लव्ह जिहाद हा प्रकार आपल्या देशात होतो आहे. त्यात मुस्लिम पुरुष हिंदू महिलांना भुलवून त्यांच्याशी विवाह करतात आणि मग त्यांना धर्मांतरित केले जाते. शिवाय, त्यांचा छळ होतो, त्यांच्यावर अत्याचार होतात मग त्यांची हत्या होते किंवा त्यांना सोडून दिले जाते. डाव्या किंवा तथाकथित पुरोगामींना ही संकल्पनाच अस्तित्वात नाही, असे वाटते. केवळ उजव्या विचारसरणीच्या लोकांमधील हा भ्रम आहे, असा समज ते करून देतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,029अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा