31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामाराज्यात वाढले अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार

राज्यात वाढले अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार

Google News Follow

Related

राज्यात अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यांमधील आकडेवारी पाहता ३६५ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. मुलींच्या अपहरणाच्या ७१६ प्रकरणांची नोंद झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या एकूण ४ हजार ५३९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी ३ हजार ५०७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

यावर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान एकूण ६१९ अत्याचाराच्या घटना घडल्या. तसेच ३६५ घटना या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या संबंधित होत्या. या गुन्ह्यांमधील ३३२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाप्रकरणी ७१६ गुन्हे नोंद झाले असून ५८६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबईत वाहन चालवणे जगात सर्वाधिक तणावपूर्ण!

बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

परमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स

२०१९ या वर्षामध्ये ६ हजार ४३८ गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात झाली. त्यातील ५ हजार ३२८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. गेल्या वर्षभरात ४४५ मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यापैकी ४१९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. गेल्या वर्षी याच आठ महिन्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या बलात्कारप्रकरणी २६४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या गुन्ह्यांमध्ये तुलना केली असता यंदा १०१ ने वाढ झाली आहे.

आठ महिन्यांमध्ये ६१९ गुन्हे बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यातील ४९७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ७२३ अपहरणाच्या गुन्ह्यांपैकी ५८९ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा